
no images were found
शिवाजी विद्यापीठात निवडणूक साक्षरता व मतदान जनजागृतीबाबत मीर तारीक अली यांची भेट
कोल्हापूर : जम्मू आणि काश्मीर या राज्यातील महिला व बाल विकास विभागाचे महासंचालक तथा विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक (सामान्य) मीर तारीक अली (श्रीनगर) यांनी आज शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागास भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून निवडणूक साक्षरता व मतदान जनजागृतीबाबत करण्यात येत असलेल्या कामाचा आढावा घेतला.
निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहभागाबद्दल श्री. अली यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही एन शिंदे, आय क्यू ए सी संचालक डॉ. सागर रेडेकर आणि वाणिज्य विभाग अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांच्याशी विद्यापीठाच्या माध्यमातून सुरु असलेल्या संशोधन, विस्तार कार्य आणि शेती विषयक विविध बाबींवर त्यांनी चर्चा करुन मौलिक सूचना केल्या. विद्यापीठाच्या जलस्वयंपूर्णतेबाबत तसेच ऊर्जा स्वयंपूर्णतेबाबतही त्यांनी समाधान व्यक्त करून भविष्यात आणखी सुधारणा होण्याच्या दृष्टीने सूचना केल्या.
यावेळी एनएसएस विभागाचे संचालक डॉ. टी.एम चौगले यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यामध्ये होत असलेले निवडणूक साक्षरतेचे काम आणि निवडणुकीसाठी प्रत्येक महाविद्यालयात स्थापन झालेल्या निवडणूक साक्षरता मंचाबाबत त्यांना माहिती दिली. मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी पोलीस मित्र म्हणून निवडणूक प्रक्रियेत सहभागी आहेत तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी प्रत्येक बुथवर सहाय्यक म्हणून कार्यरत राहणार असल्याची माहिती त्यांनी