Home शासकीय विधानसभा निवडणूकीत दिव्यांग, वयोवृध्दांना “सक्षम”चा आधार

विधानसभा निवडणूकीत दिव्यांग, वयोवृध्दांना “सक्षम”चा आधार

3 second read
0
0
12

no images were found

विधानसभा निवडणूकीत दिव्यांग, वयोवृध्दांना “सक्षम”चा आधार

 

 

कोल्हापूर :  विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये निवडणूक आयोगाने तयार केलेले सक्षम नावाचे मोबाईल ॲप दिव्यांग आणि वयोवृध्द मतदारांना (85 वर्षे व त्यापेक्षा अधिक वर्ष) मतदान करण्यासाठी आधार ठरणार आहे.

यासाठी दिव्यांग व वयोवृध्द मतदारांना सक्षम ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करुन आपली प्राथमिक माहिती भरुन मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्याची मागणी नोंदवावी लागेल. त्याव्दारे मतदारसंघातील दिव्यांग व वयोवृध्द मतदारांचे मतदारसंघ व स्थाननिश्चिती  करणे यंत्रणेला शक्य होईल. त्यानुसार वाहतूक व्यवस्था, व्हिलचेअर, सहायक इ. पोहोचविण्याची व्यवस्था निवडणूक यंत्रणेमार्फत केली जाते.

 या ॲपमध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून यात आपले मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्र, उपलब्ध प्रवेश योग्यता आणि अधिकारी संपर्क या तपशिलाचा समावेश आहे. दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल ॲपवर तक्रार देखील नोंदविता येणार आहे.

या ॲपने मतदानादिवशी व्हिलचेअरसाठी विनंती करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. दिव्यांग मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सक्षम ॲप हे महत्वाचे साधन असून हे ॲप वापरण्यास सोपे असल्याने दिव्यांग व्यक्तींनी या ॲपचा वापर करुन विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा जिल्हा दिव्यांग अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात निवड

डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात न…