
no images were found
माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाअंतर्गत 6463 महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी
कोल्हापूर : “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानाअंतर्गत नवरात्रा उत्सवात महापालिकेच्यावतीने शहरातील 18 वर्षावरील 6463 महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत 26 सप्टेंबर पासून “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शहरातील 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत 18 वर्षावरील 6463 महिला, माता व गरोदर स्त्रियांची दि.5 ऑक्टोंबरपर्यंत वैद्यकीय अधिकारी-यांमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 18 वर्षावरील 3776 महिला, माता व गरोदर स्त्रीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी उच्चरक्तदाब निदान झालेले 70, रक्तक्षय आढळलेले 36, व मधुमेह निदान झालेल्या 22 महिलांची आढळून आल्या. तर गर्भधारणापूर्व 161 महिलांची नोंदणी करुन तपासणी करण्यात आली व कुटुंब नियोजनाबाबत त्यांना समुपदेशन करण्यात आले. तसेच 1152 गरोदर मातांना वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत तपासणी करण्यात आली. त्यापैकी उच्च रक्तदाब निदान झालेली 19, तसेच 316 गरोदर मातांचे कोविड लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर 30 वर्षावरील 1374 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यापैकी, 54 महिलांचे उच्च रक्तदाब, 21 महिलांचे मधुमेहाचे निदान झाले व ह्रदयासंबंधी आजाराच्या 8 रुग्णांचे निदान झाले आहे.
“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे अभियान अद्याप सुरु असून 18 वर्षावरील महिला, माता व गरोदर स्त्रिया यांनी आरोग्य तपासणीकरीता महापालिकेच्या 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.