
no images were found
विदेशी भाषा अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मुदत वाढ
सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या रशियन / जर्मन/ जपानी / फ्रेंच / पोर्तुगीज भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी प्रवेशअर्ज भरण्याची संधी उपलब्ध आहे.
शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागातर्फे एक वर्ष कालावधीचे रशियन / जर्मन / जपानी / फ्रेंच / पोर्तुगीज या विदेशी भाषांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेण्यात येतात. यासाठी १२ वी उत्तीर्ण अशी प्रवेश अर्हता आहे. दररोज सायंकाळी एक तास याप्रमाणे वर्ग असतात. इतर अभ्यासक्रम वा नोकरी करणाऱ्यांना सुद्धा प्रवेश घेता येतो. औद्योगिक, पर्यटन, हॉटेल अशा विविध क्षेत्रात विदेशी भाषा जाणणाऱ्या लोकांची गरज असते. तिथे नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.
प्रवेशासंबंधी माहिती www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावरील “Admission” या लिंकवर उपलब्ध आहे. अधिकच्या माहितीसाठी व प्रवेशासाठी विदेशी भाषा विभाग, भाषा भवन, शिवाजी विद्यापीठ येथे त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात येत आहे.