
no images were found
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काम करण्यास इच्छुकांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
कोल्हापूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हातकणंगले व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुर्केवाडी ता.चंदगड येथे काम करण्यास इच्छुकांनी आपले प्रस्ताव 1 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
काम देणाऱ्या आस्थापनेचे नाव, कामाचे स्वरुप, संख्या, कालावधी व मानधन/वेतन, कालावधी – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,हातकणंगले – सफाई कामगार- 1, कालावधी 11 महिने व वेतन रुपये 493 रु. प्रतिदिन. औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुर्केवाडी ता.चंदगड – सफाई कामगार- 1, कालावधी 11 महिने व वेतन रुपये 493 प्रतिदिन याप्रमाणे असणार आहे.
अटी व शर्ती – बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी यांची स्थापना ही ऑगस्ट 2000 नंतर झालेली असावी. तसेच सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी.बेरोजगारांची सहकारी सेवा सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस रु. 3 लाखापर्यंतची कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. सहकारी सेवा सोसायटी खाते सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा सोसायटीच्या आर्थिक उलाढालीचे नियमीत वार्षिक लेखापरिक्षण केलेले असावे. सन 2020-21, 2021-22, 2022-23 चे लेखापरिक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. सहकारी सेवा सोसायटी/लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना ओळखपत्र देणे आवश्यक असून ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशील नसतील त्यांची नावे सदर सहकारी सेवा सोसायटीतून कमी करुन त्याठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या छायांकीत प्रती, प्रमाणपत्र मूळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. हे काम हातकणंगले, चंदगड तालुक्यातील असल्याने तालुका व जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या नोंदणीकृत कार्यरत संस्थांनी या कार्यालयाकडे अर्ज, प्रस्ताव सादर करावेत. अर्ज/प्रस्तावासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकीत प्रत जोडावी. संस्था अवसायानात निघाली असेल तर प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये.
वरील अटी पूर्ण करणाऱ्या कार्यरत सेवा सहकारी संस्थांनी आपल्या इच्छापत्रासह प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 1 जानेवारी 2024 पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयास सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असेही श्री. माळी यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.