no images were found
बलाढ्य औरंगाबाद संघावरती विजय प्राप्त करून शिवाजी विद्यापीठ संघ अखिल भारतीय अंतरी विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र
झुंझुनू राजस्थान – येथे दिनांक 18 ऑक्टोबर 2020 पासून चालू असलेल्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेमध्ये आज सायंकाळच्या सत्रामध्ये क्वालिफाईड मॅच मध्ये गतवर्षीच्या विजेता औरंगाबाद शिवाजी विद्यापीठ संघाने 29- 35 अशा सहा गुणांनी विजय प्राप्त करून अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला
सुरुवातीपासूनच चुरशीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये औरंगाबाद संघाने पहिला पाच मिनिटात आक्रमक खेळीद्वारे शिवाजी विद्यापीठ संघावरती लोन चढवत दोन 11 अशी नऊ गुणांची आघाडी घेतली . परंतु त्यानंतर अभिषेक गुंगे यांनी केलेल्या उत्कृष्ट चढाया विजय खडके यांनी दिलेली साथ तर कर्णधार वैभव राबाडे व साईप्रसाद पाटील यांनी केलेल्या अप्रतिम पकड्या यांच्या जोरावर शिवाजी विद्यापीठ संघाने लोण चढविला.
मध्यंतरापर्यंत 14 19 अशा पाच गुणांची आघाडी औरंगाबाद संघाकडे होती. मध्यंतरानंतर अभिषेक गुंगे यांनी एकाच चढाईत बोनस व तीन गुण असे चार पॉईंट घेऊन सामन्याला कलाटणी दिली त्या साईप्रसाद पाटील व कर्णधार वैभव दाभाडे यांनी केलेल्या अप्रतिम पकडामुळे शिवाजी विद्यापीठ संघाने औरंगाबाद वर पुन्हा लोन चढविला. शेवटच्या पाच मिनिटांमध्ये शिवाजी विद्यापीठाकडे तीन गुणांची आघाडी होती भक्कम अशा क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती शिवाजी विद्यापीठ संघाने हा सामना सहा गुणांनी जिंकला व बेस्ट ऑफ फोर मध्ये प्रवेश केला. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा या दिनांक 24 ते 28 नोव्हेंबर अखेर झुंझुनू येथे होणार आहेत.