
no images were found
अॅड. अभिषेक मिठारी यांच्याकडून शरण अध्यासनासाठी ११ हजारांची देणगी
कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अॅड.अभिषेक मिठारी यांनी शरण साहित्य अध्यासनासाठी अकरा हजार रुपयांची देणगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे काल सुपूर्द केली.
अॅड. अभिषेक मिठारी यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये शरण साहित्य अध्यासन उभारण्याचा ठराव मांडण्यापासून ते उभे करण्यासाठीच्या प्रयत्नांतील प्रत्येक टप्प्यावर सहभाग राखला आहे. त्यानुसार आज त्यांनी अध्यासनासाठी आवश्यक कॉर्पस निधीसाठी गेल्या वर्षभरात विविध व्याख्याने, कार्यशाळा आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून प्राप्त झालेले मानधन ११,००० रुपये कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे धनादेशाच्या स्वरुपात सुपूर्द केले. आपले प्रेरणास्रोत असलेले पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या ९० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शरण साहित्य अध्यासनासाठी हा निधी विद्यापीठाकडे सुपूर्द करीत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांचेसमवेत यश आंबोळे उपस्थित होते.