no images were found
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान
कोल्हापूर (प्रतिनिधी):दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या ‘हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप’ संस्थेमधील १० शिक्षकांचा रोटरी क्लब ऑफ इव्हॉल्वकडून ‘बिल्डर्स ऑफ नेशन’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, इव्हॉल्वच्या अध्यक्षा सलोनी घोडावत म्हणाल्या की, “आजघडीला समाजामध्ये प्रत्येकजण स्वतः साठी जगण्यात व्यस्त आहेत. पण काही माणसे मात्र इतरांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी जगत आहेत. अशी माणसे म्हणजे आपल्या समाजासाठी चालतेबोलते दीपस्तंभच आहेत. दिव्यांग लोकांच्या जीवनात सन्मान आणि स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी सतत सेवारत असणाऱ्या हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅप संस्थेमधील अशा शिक्षकांचा गौरव करणे हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि कृतज्ञतेचा क्षण आहे. रोटरी क्लब ऑफ इव्हॉल्वच्या माध्यमातून आम्ही नेहमीच अशा सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेत राहू”.
‘हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅप’ ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर मध्ये अपंग पुनर्वसन आणि शिक्षणाचा अत्यंत मूलभूत आणि स्तुत्य काम करत आहे. हे काम करताना अनेक अडचणींवर मात करून येथील विद्यार्थ्याच्या जीवनात चैतन्य आणि आणि आनंद भरणारे येथील शिक्षक म्हणजे निस्वार्थ सेवाकार्याचे मूर्तिमंत प्रतिक आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव करताना या संस्थेतील श्री.देवानंद भाडळे, कु. अंजना लागस, मिलिंद गुरव, श्री सचिन वसावे , सौ.मोनिका खैरमोडे-गिरीगोसावी, सौ.मुग्धा गोरे-लिंगनूरकर, श्री.मनोज शेडगे, सौ.संजीवनी कोळी, सौ.विभावरी सावंत व श्री.संदीप मोरे या १० शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला सलोनी घोडावत, डॉ. ममता बियाणी,निलाभ केडिया, निकेत दोशी,निखिल दुल्हानी, निलाभ गोयंका या सोबत कोल्हापूर आणि परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, इव्हॉल्व चे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.