
no images were found
मालिका ‘अलिबाबा दास्तान-ए-काबुल’मध्ये शेहजान खान स्वत:हून स्टण्ट्स करतो
सोनी सबवरील मालिका ‘अलिबाबा दास्तान-ए-काबुल’अलिबाबा व शेहजारी मरियममध्ये बहरत असलेली केमिस्ट्री, मित्रांमधील अविरत गमतीजमती, सिमसिमच्या आदेशावरून तलिसमनचा शोध घेणारे ४० चोर आणि रोमांचक सीक्वेन्सेससह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
मालिकेमध्ये अलिबाबाची भूमिका साकारणाऱ्या शेहजान खानने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर एक रील पोस्ट केला, ज्यामध्ये तो मामुली गल्लीमध्ये (मालिकेमधील सामान्य लोकांची वस्ती) स्टण्ट्स करताना दिसत आहे. तो कवच व लाकडी काठीसह स्टण्ट्स करताना दिसत आहे. फाइट सीक्वेन्सचे कौतुक करणारे, तसेच यांचे चित्रीकरण कसे केले जाते याबाबत माहिती नसलेल्या अलिबाबाच्या सर्व चाहत्यांसाठी खाली एक व्हिडिओ देण्यात आला आहे.
हे स्टण्ट्स करणे सोपे आहे का? शेहजान म्हणाला, ‘’असे स्टण्ट्स करणे नेहमीच सोपे नसते. केबल किंवा हार्नेस वर्क आव्हानात्मक असते. यासाठी शारीरिक शक्तीसह संतुलन राखणे देखील महत्त्वाचे असते. कधी-कधी हार्नेसमुळे मी अडकलो किंवा खाली पडलो आहे आणि मला अनेक वेळा रिटेक्स घ्यावे लागले आहेत.’’ पण टेलिव्हिजनवरील लाडक्या अलिबाबाला त्याचे स्टण्ट्स करायला आवडते.