no images were found
सोनी सबवरील कलाकार दसऱ्याशी संबंधित आपल्या आठवणी सांगत आहेत
वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या विजयादशमीच्या सणाचे भारतीयांच्या मनात विशेष स्थान आहे. सोनी सबवरील आघाडीचे कलाकार दसऱ्याच्या आपल्या छान छान आठवणी शेअर करत आहेत. ज्यामध्ये रामलीलामध्ये सहभागी होण्यापासून ते पारंपरिक खाद्य पदार्थांवर ताव मारण्याच्या आठवणी आहेत. या सणाची लक्षणीयता सांगताना आजच्या जगात कोणत्या मूल्यांचे सिंचन या सणामुळे होते, याबाबत आपले विचार ते मांडत आहेत.
‘श्रीमद् रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करत असलेला सुजय रेऊ म्हणतो, “टीव्ही वर रामायण बघण्याच्या आणि आजीकडून राम आणि रावणाच्या गोष्टी ऐकण्याच्या माझ्या सुंदर आठवणी आहेत. मोठा झाल्यावर विजयादशमीचा अधिक गहन, लक्षणीय अर्थ मला समजला. हा सण म्हणजे चांगल्याचा वाईटावरील विजयाचे प्रतीक आहे. मी रामलीलेत कधीच सहभागी झालो नाही, पण देशभरात अनेक ठिकाणी मी रामलीला पाहिली आहे. आता मी खुद्द श्रीरामाची भूमिका करत आहे, ही जाणीव तर स्वप्नवत आहे! माझ्या चाहत्यांना मी इतकेच सांगेन की श्रीरामाची सुजाणता आणि निष्ठा त्यांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात अंगी बाणावी. आजच्या या धावपळीच्या जगात मनातील शांती अबाधित ठेवून जीवनाचे मौल्यवान धडे गिरवणे महत्त्वाचे आहे.”
वागले की दुनिया मालिकेत राजेशची भूमिका करणारा सुमित राघवन म्हणतो, “दसऱ्याच्या निमित्ताने लहानपणीच्या आनंद आणि उत्साहाने भरलेल्या आठवणी मनात जाग्या होतात. चांगल्याचा नेहमी वाईटावर विजय होतो, याचे पुन्हा स्मरण होते. मला वाटते आपली मूल्ये आणि नीतीमत्ता यांचे पालन करण्याची शिकवण या पर्वातून मिळते. या पर्वाची सकारात्मकता आत्मसात करून जीवनात आनंद आणि सुखाला जागा करून देण्याची विनंती मी सर्वांना करेन.”
‘बादल पे पांव है’ मालिकेत रजत खन्ना ही व्यक्तिरेखा साकारणारा आकाश आहुजा म्हणतो, “दसऱ्याशी निगडीत माझ्या सुंदर आठवणी आहेत, विशेषतः माझा भाऊ आणि मी एकदा एका स्थानिक समारंभासाठी राम आणि लक्ष्मणाच्या रुपात तयार झालो होतो हे मला आठवते. त्यावेळी श्रीरामाच्या गुणांनी मी खूप प्रभावित झालो होतो. दसरा आपल्याला आठवण देतो की, आपल्या सगळ्यांमध्ये नानाविध व्यक्तिरेखा लपलेल्या असतात. मनातल्या रावणावर मात करून श्रीरामाचे गुण आपणे अंगिकारले पाहिजेत. माझ्या चाहत्यांना मी सांगेन की, विजयादशमीचा जो संदेश आहे तो आपल्या जीवनात उतरवा आणि नकारात्मकतेवर मात करण्यासाठी लढत रहा.”
‘बादल पे पांव है’ मालिकेत बिशन खन्ना ही व्यक्तिरेखा साकारणारा सूरज थापर म्हणतो, “लहानपणी या दिवशी मी माझ्या कुटुंबीयांसोबत रामलीला बघायला जायचो आणि गोड भात आणि जिलबीचा आस्वाद घ्यायचो. रावणदहन बघताना जो रोमांच मी अनुभवायचो, तो आजही स्पष्ट आठवतो. यावर्षी मी चंदीगडमध्ये असलो आणि माझी मुले मुंबईत असली तरी आपली परंपरा साजरी करण्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी खास करण्याचा माझा विचार आहे. दसऱ्याचे औचित्य साधून क्रोधाचा त्याग करून क्षमा वृत्ती अंगिकारण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करेन. श्रीरामाने सत्याच्या साथीने रावणाचा पराभव केला होता. त्याच प्रमाणे, मागील वैर विसरल्यास शांती प्रस्थापित होते आणि आनंद लाभतो.”