Home सामाजिक ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रम नवीन दिमाखदार रुपात पुन्हा सुरु पहिल्या भागात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मुलाखत

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रम नवीन दिमाखदार रुपात पुन्हा सुरु पहिल्या भागात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मुलाखत

41 second read
0
0
32

no images were found

जय महाराष्ट्र‘ कार्यक्रम नवीन दिमाखदार रुपात पुन्हा सुरु पहिल्या भागात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मुलाखत

 

          मुंबईदि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र हा कार्यक्रम नवीन दिमाखदार स्वरूपात दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन जनतेच्या भेटीला येत आहे. जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमाच्या नवीन स्वरूपातील पहिल्या भागात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

उदंड प्रतिसाद लाभलेल्या जय महाराष्ट्रचे जनतेच्या मनात आगळेवेगळे स्थान

          माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमाने मागील अनेक वर्षांपासून जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले असून या कार्यक्रमाला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्रीमंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरसंबंधित क्षेत्रातील अभ्यासक व विचारवंत यांच्या मुलाखती प्रसारित करण्यात येतात. आताही या कार्यक्रमात नवीन स्वरूपात विविध विषयांवरील मुलाखती व संवाद सादर करण्यात येणार आहेत.

विकसित महाराष्ट्राबाबत मुख्य सचिवांनी मांडले विचार

          राज्य शासन जनतेच्या कल्याणासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेत आहे. हे निर्णय विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहे. शिक्षणआरोग्यउद्योगकृषीआपत्ती व्यवस्थापनतसेच महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यात युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच मुख्यमंत्री  माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक निर्भर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनांचे नियोजन व अंमलबजावणी याबाबत मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमाच्या नवीन स्वरूपातील पहिल्या भागात जनतेशी संवाद साधला आहे.

          जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ८ वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम कोल्हापूर/ प्रतिनिधी:-…