no images were found
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’अंतर्गत मेळाव्याचे आयोजन
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, कोल्हापूर यांचेमार्फत “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” (CMYKPY) अंतर्गत मेळावा गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे. मेळाव्यात जिल्ह्यातील नामांकित आस्थापना सहभागी होणार आहेत. तरी 12 वी, आय.टी.आय., पदवीका, कोणताही पदवीवर, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण शैक्षणिक गुणवत्ता, व फोटो, आधारकार्ड इ. सह मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम. एस. आवटे यांनी केले आहे.
पात्रता- उमेदवाराचे वय 18 ते 35 वयोगटातील असावे, कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल, उमेदवार 12 वी, आय.टी.आय.,पदवीका, कोणताही पदवीधर, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा, उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवाराची आधार नोंदणी असावी, उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
शैक्षणिक अर्हतेनुसार शासनाकडून 12 वी पास उमेदवारांना 6 हजार, आय.टी.आय, पदवीधर उमेदवारांना 8 हजार व पदवीधर, पदव्युत्तर उमेदवारांना 10 हजार रुपये विद्यावेतन दरमहा थेट दिले जाणार आहे.