Home सामाजिक एसएमएफजी इंडिया क्रेडिटद्वारे 1000व्या शाखेचा आरंभ; विशेष आवरण आणि माय स्टँप प्रकाशनाद्वारे या मैलाच्या टप्प्याचा सोहोळा

एसएमएफजी इंडिया क्रेडिटद्वारे 1000व्या शाखेचा आरंभ; विशेष आवरण आणि माय स्टँप प्रकाशनाद्वारे या मैलाच्या टप्प्याचा सोहोळा

4 second read
0
0
27

no images were found

एसएमएफजी इंडिया क्रेडिटद्वारे 1000व्या शाखेचा आरंभ; विशेष आवरण आणि माय स्टँप प्रकाशनाद्वारे या मैलाच्या टप्प्याचा सोहोळा

मुंबई : एसएमएफजी इंडिया क्रेडिट कं. लि., भारताची गैर-बँकींग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असून, त्यांनी वाशी, नवी मुंबई इथे आपल्या 1000व्या शाखेच्या आरंभाची घोषणा केली आहे. या लक्षणीय प्रसंगामुळे देशभरातील आपला विस्तार करण्यामागील आणि अद्याप शिरकाव न झालेल्या बाजारपेठांपर्यंत वित्तीय सेवा पोहोचवण्यातील कंपनीची अढळ निष्ठा दृग्गोचर झाली आहे. या लक्षणीय मैलाच्या टप्प्याच्या निमित्त, एमएमएफजी इंडिया क्रेडिटनं इंडिया पोस्टसोबत सहयोग करुन एक विशेष आवरण आणि माय स्टँप प्रकाशित केले. या अधिकृत अनावरण प्रसंगी श्री. योगी कोजी, कॉन्सुल-जनरल, जपानचे मुंबईतील कॉन्सुलेट-जनरल, श्री. अभिजीत बनसोडे, संचालक – टपाल सेवा (मुख्यालय) महाराष्ट परिमंडळ, सोबत श्री. शांतनु मित्रा, सीईओ आणि एमडी, एसएमएफजी इंडिया क्रेडिट हे मान्यवर उपस्थित होते.

1000व्या शाखेचा आरंभ म्हणजे भव्य आणि वैविध्यपूर्ण भारतीय बाजारपेठेच्या अंतर्गत आपली उपस्थिती आणखी खोलवर नेण्याच्या एसएमएफजी इंडिया क्रेडिटच्या धोरणात्मक दृष्टिकोनाची ही पावती आहे. 2007 मध्ये स्थापना झाल्यापासून, कंपनीने निरंतर वृद्धिचा पाठपुरावा करत, एक अखिल-भारतीय संस्थेत रुपांतर केले आहे जी आता 670 हून अधिक शहरं आणि 70,000 गावांमध्ये कार्यरत असून, 23,000 हून अधिक कर्मचाऱ्यांचं पाठबळ तिला लाभलं आहे.

मागील दोन वर्षांमध्ये, एमएमएफजी इंडिया क्रेडिटने अंदाजे 300 नवीन शाखांची भर घातली असून, यापैकी लक्षणीय 95% शाखा स्तर-2+ शहरं आणि अर्ध-ग्रामीण भागांमध्ये स्थापन केलेल्या आहेत. हा विस्तार संपूर्ण भारतातील वैविध्यपूर्ण लोकसंख्येला औपचारिक पत पुरवठा देण्यासाठी कंपनीच्या मोहिमेशी सुसंगत आहे, त्याद्वारे त्यांना वित्तीय स्वातंत्र्य साध्य करण्याची शक्ती मिळाली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…