Home Uncategorized रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी सकारात्मक पावले उचला : राजेश क्षीरसागर 

रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी सकारात्मक पावले उचला : राजेश क्षीरसागर 

1 second read
0
0
23

no images were found

रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी सकारात्मक पावले उचला : राजेश क्षीरसागर 

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या पवडी, आरोग्य, ड्रेनेज, उद्यान व अन्य विभागाकडे गेली ३० ते ३५ वर्षे रोजंदारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ५०० च्या वर आहे. या कर्मचाऱ्याना सोलापूर परभणी महानगरपालिकेच्या धर्तीवर कायम सेवेत घेण्याबाबत नियमोचीत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासन नगरविकास विभागाचे महानगरपालिकेला दिले आहेत. त्यानुसार रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, यामध्ये महानगरपालिकेने सकारात्मक पावले उचलावीत, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास दिल्या.

मनपा रोजंदारी कर्मचारी यासह शहरातील विविध विषयांच्या अनुषंगाने महानगरपालिकेत आढावा बैठक पार पडली. यावेळी सूचना देताना राजेश क्षीरसागर यांनी, महापालिकेने कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा देण्यासाठी आर्थिक सक्षमता वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी महापालिकेतील उपलब्ध उत्पन्न स्त्रोतांचे पुन:निरीक्षण करून ज्या स्त्रोतांतून उत्पन्न वाढवणे शक्य आहे त्याबाबत पावले उचलावीत. शहरातील घरफाळ्याबाबत जी सर्वेक्षण हाती घेतलेले आहे ते अत्यंत निपक्षपणे व काटेकोरपणे करावे, ज्या ठिकाणी विना परवाना बांधकामे झालेली आहेत त्यावर कारवाई करावी नियमांमध्ये शक्य असल्यास ती नियमानुकूल करून त्याद्वारे महापालिकेत महसूल जमा करावा. शहरातील अनेक बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले बाबत खात्री करून जिथे अंतर पुरवठा प्रमाणपत्र घेतलेले नाहीत अशा ठिकाणी पुन्हा सर्वेक्षण करून प्रमाणपत्र वितरित करून त्याच्या फीद्वारे महसूल संकलनात वाढ करावी.
कोल्हापूर शहरातील झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड देणेबाबत सुरू असणारे प्रक्रिया अधिक गतिमान करून त्यांना लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्याची कार्यवाही करावी. शहरातील विविध ठिकाणी असणारे हायमास्ट लॅम्प बंद आहेत त्यावर तातडीने कार्यवाही करून बंद हायमास्ट तात्काळ सुरु करावेत. कोल्हापूर महानगरपालिकेला शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून सुरू असणारी कामांना गती देऊन ती कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. महानगरपालिकेच्या गाळेधारकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू असून त्यावर लवकर निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

या बैठकीस आयुक्त के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, संजय सरनाईक, अग्निशमन दलाचे प्रमुख मनिष रणभिसे आदी अधिकारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…