no images were found
कोल्हापूर जिल्हा ज्युनिअर (एकोणवीस वर्षाखालील) व अकरा वर्षाखालील मुला-मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापूरात
कोल्हापूर :- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने अनयाज् चेस क्लब ने कोल्हापूर जिल्हा ज्युनिअर (एकोणवीस वर्षाखालील) व अकरा वर्षाखालील मुला-मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धा शनिवार दि. 24 व रविवार दि.25 ऑगस्ट रोजी आयोजित केली आहे..
बालकृष्ण हवेली मंदिर,महावीर गार्डन समोर, नागाळा पार्क, कोल्हापूर मध्ये या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळाच्या नियमानुसार होणार आहेत.शनिवारी दुपारी साडेबारा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर एक वाजता कोल्हापूर जिल्हा ज्युनिअर (एकोणवीस वर्षाखालील) मुला-मुलींच्या स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल.रविवारी सकाळी दहा वाजता कोल्हापूर जिल्हा अकरा वर्षाखालील मुला मुलीची स्पर्धेची पहिली फेरी सुरू होणार आहे.अकरा वर्षाखालील स्पर्धेसाठी 1/1/2013 ला किंवा त्यानंतर जन्मलेल्या व एकोणवीस वर्षाखालील स्पर्धेसाठी 1/1/2005 ला किंवा त्यानंतर जन्मलेल्या फक्त कोल्हापूर जिल्हातील मुलामुलींना स्पर्धेत भाग घेता येईल.
अकरा वर्षाखालील निवड स्पर्धेतून दोन मुले व दोन मुलींची निवड 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2024 दरम्यान कोल्हापूरात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुलामुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे़ व एकोणवीस वर्षाखालील निवड स्पर्धेतून चार मुले व चार मुलींची निवड 5 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2024 दरम्यान कोल्हापूरात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर एकोणवीस वर्षाखालील मुलामुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे़.
दोन्ही स्पर्धेतील मुले आणि मुली गटातील विजेत्या निवड झालेल्या खेळाडूस रोख बक्षीसे व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. एकोणवीस वर्षाखालील मुले-मुली गटात मिळून एकूण सहा हजार रुपयांची तर अकरा वर्षाखालील मुले-मुली गटात मिळून एकूण चार हजार रुपयांची रोख बक्षीसे आहेत.
याव्यतिरिक्त दोन्ही गटात 10 मेडल्स उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून दिली जाणार आहेत.
निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना स्पर्धा खेळण्यासाठी संघटनेचा टी-शर्ट व राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळून झाल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे.
या दोन्ही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक स्पर्धेस रुपये दोनशे प्रवेश शुल्क ठेवले आहे. तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश फी सह आपली नावे खालील व्यक्तीकडे नोंदवावीत.
1) आरती मोदी – 8149740405
2) मनीष मारुलकर – 9922965173
3) उत्कर्ष लोमटे – 9923058149
4) प्रितम घोडके – 8208650388
5) रोहित पोळ – 9657333926