Home धार्मिक योग ही जीवन पद्धती सर्वांनी अंगिकारणे गरजेचे –  एकनाथ शिंदे

योग ही जीवन पद्धती सर्वांनी अंगिकारणे गरजेचे –  एकनाथ शिंदे

47 second read
0
0
19

no images were found

योग ही जीवन पद्धती सर्वांनी अंगिकारणे गरजेचे –  एकनाथ शिंदे

 

            मुंबई  : निरोगी शरीरासाठी योग खूप महत्त्वाचा आहे. योग ही जीवनपद्धती आहे ती जर सर्वांनी अंगिकारली तर नक्कीच सुदृढ नागरिक घडू शकतात. सुदृढ नागरिक ही राज्याची संपत्ती असते, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

             मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागामार्फत  योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसक्रीडामंत्री संजय बनसोडेअपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह  योगा इन्स्टिट्यूटचे सहायक संचालक ऋषी जयदेव योगेंद्र यांच्यासह इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे  म्हणाले कीयोगचा प्रचार व प्रसार होण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभर साजरा केला जात आहे. योग जीवनशैलीमुळे जीवनात सकारात्मकता निर्माण  होते त्यामुळे प्रत्येकाने दररोज योग करणे गरजेचे आहे. शरीर आणि मन जोडण्याचे काम योग करतेअसेही मुख्यमंत्री म्हणाले.

            यावेळी अर्धा तास चालेल्या योग सत्रात मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहलसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरराज्य उत्पादन शुल्कचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकरमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्तामहाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा प्रधान सचिव मनीषा वर्मामुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगेपर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडेवैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेकौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.                 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…