Home सामाजिक स्‍कोडा ऑटो इंडियाकडून कुशाक आणि स्‍लाव्हियावर नवीन मूल्‍य तत्त्वाची घोषणा

स्‍कोडा ऑटो इंडियाकडून कुशाक आणि स्‍लाव्हियावर नवीन मूल्‍य तत्त्वाची घोषणा

2 min read
0
0
115

no images were found

स्‍कोडा ऑटो इंडियाकडून कुशाक आणि स्‍लाव्हियावर नवीन मूल्‍य तत्त्वाची घोषणा

 

 

 कोल्हापूर  : स्‍कोडा ऑटो इंडियाने ब्रँड अधिक प्रमाणात उपलब्‍ध असण्‍याच्‍या आपल्‍या उपक्रमांना कायम ठेवत उच्‍च मूल्‍य असलेल्‍या कुशाक व स्‍लाव्हियाची घोषणा केली. यामुळे ५-स्‍टार रेटेड आणि प्रौढ व्‍यक्‍ती व लहान मुलांसाठी पूर्णत: सुरक्षित असलेल्‍या कार्सची ही लाइन-अप अधिक प्रमाणात उपलब्‍ध झाली आहे.

 यापूर्वी अॅक्टिव्‍ह, अॅम्बिशन व स्‍टाइल या व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या कुशाक आणि स्‍लाव्हिया आता क्‍लासिक, सिग्‍नेचर व प्रेस्टिज या नावांनी उपलब्‍ध आहेत. या तीन व्‍हेरिएण्‍ट्स व्‍यतिरिक्‍त कुशाक मूल्‍यावर ओनिक्‍स आणि लाइन-अपच्‍या प्रिमिअम स्‍तरावर मॉण्‍टे कार्लो व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये देखील उपलब्‍ध आहे. नवीन किमती कुशाकचे सर्व इंजिन व ट्रान्‍समिशन पर्याय आणि स्‍लाव्हियाच्‍या निवडक व्‍हेरिएण्‍ट्सवर लागू आहे. दोन्‍ही कार्समध्‍ये १.० टीएसआय पेट्रोल इंजिन शक्‍तीसह सिक्‍स-स्‍पीड मॅन्‍युअल व ऑटोमॅटिक आणि १.५ टीएसआय पेट्रोल इंजिन शक्‍तीसह सिक्‍स-स्‍पीड मॅन्‍युअल व सेव्‍हन-स्‍पीड डीएसजी आहे. कुशाक व स्‍लाव्हिया या दोन्‍ही कार्समध्‍ये रेंजमधील प्रमाणित म्‍हणून सहा एअरबॅग्‍ज आहेत. तसेच या दोन्‍ही कार्सने ग्‍लोबल एनसीएपी चाचणी अंतर्गत प्रौढ व्‍यक्‍ती व लहान मुलांसाठी संपूर्ण ५-स्‍टार रेटिंग प्राप्‍त केले आहे, ज्‍यामधून ब्रँडची सुरक्षिततेसंदर्भात तडजोड न करणारा दर्जा दिसून येतो.

 स्‍कोडा ऑटो इंडियाच्‍या कुशाक व स्‍लाव्हियावर ४-वर्ष/१००,००० किमी प्रमाणित वॉरंटी देते, तसेच ही वॉरंटी ६-वर्ष/१५०,००० किमीपर्यंत वाढवण्‍याचा पर्याय देखील आहे. यामुळे विनासायास मालकीहक्‍क व मेन्‍टेनन्‍स अनुभव देण्‍यासाठी कंपनीच्‍या प्रयत्‍नामधील हे सर्वात सर्वसमावेशक वॉरंटी पॅकेज आहे. नवीन किमती या ग्राहक-अनुकूल पॅकेजेसमध्‍ये उपलब्‍ध आहेत.

या सुधारणेबाबत मत व्‍यक्‍त करत स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्‍हणाले, ”आम्‍ही जवळपास पंचवीस वर्षांपासून भारतात कार्यरत आहोत आणि या बाजारपेठेप्रती आमची कटिबद्धता दृढ आहे. आम्‍ही उत्‍पादन व संलग्‍न कृतींमध्‍ये अधिकाधिक सुविधा देण्‍याचा प्रयत्‍न करतो. २०२५ साठी नियोजित आमच्‍या नवीन कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीच्‍या घोषणेपासून आम्‍ही या नवीन कारसह दर्जा कायम राखला आहे, तसेच आम्‍ही नवीन बाजारपेठा, तरूण ग्राहक आणि ब्रँडची अधिक उपलब्‍धता यावर लक्ष्‍य केले आहे. नवीन कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही आमच्‍यासाठी नवीन बाजारपेठा खुल्‍या करेल, आम्‍ही कुशाक व स्‍लाव्हियामध्‍ये काही कार्यक्षमता संपादित केल्‍या आहेत, ज्‍यामुळे आम्‍ही आमच्‍या ऑफरिंग्‍जमधील मूल्‍य वाढवण्‍यास आणि ग्राहकांना व चाहत्‍यांना फायदे देण्‍यास सक्षम झालो आहोत.” 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…