
no images were found
डिकेटीईमध्ये ओपन हाउस उपक्रमास भरघोस प्रतिसाद
इचलकरंजी(प्रतिनिधी) :. डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये ‘मी राजवाडा बोलतोय‘ – ओपन हाउस सेशन ऍट कॅम्पस हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने संपन्न झाला. सदर कार्यक्रमास इंजिनिअरींग ला ऍडमिशन धेवू इच्छुक विद्यार्थी व पालकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याला १२०० हून अधिक विद्यार्थी व पालकांनी प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरवात कार्यक्रमास सर्वात प्रथम उपस्थित असलेले विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली . त्यानंतर संस्थेच्या प्रभारी संचालिका प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे यांनी स्वागतपर मार्गदर्शन करुन कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. राजवाडयात या, पहा व आपले प्रवेशासंबंधी मत ठरवा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. त्यानंतर प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ ए.के. घाटगे यांनी इंजिनिअरींग प्रवेश प्रक्रियेविषयी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सार हे प्रा. डॉ .सौ. अश्विनी रायबागी यांनी मी राजवाडा बोलतोय या मनोगतात सर्वांसमोर मांडले. प्रा. प्रतिमा चौगुले यांनी तयार केलेल्या डीकेटीईवरील माहितीपटाद्वारे विद्यार्थ्यांना संस्थेची अधिक माहिती मिळाली.
यानंतर कार्यक्रमाचा मुख्य भाग सुरु झाला. यामध्ये डीकेटीईच्या माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजची माहिती सांगितली. येथील शैक्षणिक वातावरण, सुसज्ज प्रयोगशाळा, दर्जेदार प्लेसमेंट हे सारे सांगतांना प्रत्येकाने येथे असलेल्या कौटुंबिक वातावरणाचाही उल्लेख केला.जुनैद मोमीन, विवेक मंगसुळे नंदीनी होनमुते व मानसी महाजन या डीकेटीईच्या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर अरविंद चव्हाण यांनी पालक म्हणून संस्थेशी असलेले नाते स्पष्ट केले. यानंतर सर्वजणांची गटवार विभागणी करुन सर्वांना महाविद्यालय दाखविण्यात आले. तेथेही विद्यार्थी व शिक्षकांशी सर्वांचा मुक्त संवाद झाला. कार्यक्रमच्या आयोजनाबददल विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आण्णा आवाडे, मानद सचिव प्रा. डॉ. सौ. सपना आवाडे, प्र. संचालिका प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे, सर्व डीन्स, सर्व विभागप्रमुख यांचे मार्गदर्शन मिळाले. सोशल डीन प्रा. एस. जी. कानिटकर यांनी प्रभावी सुत्रसंचालन केले.