Home राजकीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शहरात विविध विकासकामांचे उद्घाटन

स्वातंत्र्य दिनानिमित्त राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शहरात विविध विकासकामांचे उद्घाटन

4 second read
0
0
102

no images were found

स्वातंत्र्य दिनानिमित्त राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शहरात विविध विकासकामांचे उद्घाटन

 

कोल्हापूर  ( प्रतिनिधी ):- देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उद्या दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न होणार आहे. सकाळी ९.३० वाजता मुलभूत सोई सुविधा योजनेतून मंजूर सुबराव गवळी तालीमीच्या इमारत बांधकामाचा (रु.२५ लाख) शुभारंभ पार पडणार आहे. सकाळी ११ वाजता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत मंजूर लक्ष्मी गल्ली व दत्त गल्ली पापाची तिकटी येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामाचा शुभारंभ होणार आहे. यानंतर प्रामुख्याने श्री.राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत मंजूर रु.१००.३३ कोटी मधील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ पार पडणार आहे. सकाळी ११.३० वाजता अॅपल हॉस्पिटल ते वसंतनगर ते जिल्हा परिषद कम्पौंड, सकाळी ११.४५ वाजता गोल्ड जिम ते सदरबाजार चौक आणि दुपारी १२ वाजता रसिका हॉटेल ते जाधववाडी रिंगरोड या विकास कामांचा शुभारंभ होणार आहे.

    

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई

पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा …