Home मनोरंजन रक्षाबंधनबद्दल अर्जित तनेजाचे भाष्यः विराटप्रमाणे मीसुद्धा माझ्या बहिणीसाठी काहीही करू शकतो!

रक्षाबंधनबद्दल अर्जित तनेजाचे भाष्यः विराटप्रमाणे मीसुद्धा माझ्या बहिणीसाठी काहीही करू शकतो!

9 second read
0
0
55

no images were found

रक्षाबंधनबद्दल अर्जित तनेजाचे भाष्यः विराटप्रमाणे मीसुद्धा माझ्या बहिणीसाठी काहीही करू शकतो!

 

रक्षाबंधनाचा सण आता अगदी जवळ येऊन ठेपला असून झी टीव्हीवरील मालिका ‘कैसे मुझे तुम मिल गये’ आपल्या आगामी भागांमध्ये हा सण साजरा करण्यासाठी सज्ज आहे. ह्या मालिकेत विराटची भूमिका करणाऱ्या अर्जित तनेजासाठी हा मालिकेतील फक्त एक ट्रॅक नाहीये तर आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या ह्या नात्याची खास आठवण आहे. आपल्या व्यक्तिरेखेच्या भावभावनांमध्ये डोकावून पाहत असताना त्याला त्याच्या खऱ्या बहिणीसोबतच्या नात्याची आठवण आली आणि त्यांच्या रक्षाबंधनाच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या.

अर्जित म्हणाला, रक्षाबंधनच्या सणाला माझ्या हृदयात खास स्थान असून दरवर्षी मी मोठ्‌या उत्साहाने ह्या दिवसाची वाट पाहतो. ह्यावर्षी आमची मालिका ‘कैसे मुझे तुम मिल गये’मध्ये ह्या सणाच्या निमित्ताने ट्रॅकही आहेज्यामुळे आमच्या अनेक सुंदर आठवणी जाग्या झाल्या आहेत. अन्य कुठल्याही भावाबहिणीप्रमाणे माझी बहिणही माझ्या मनगटावर राखी बांधते आणि मी तिला काहीतरी छान भेटवस्तू देतो. मला आजही आठवतंय की जेव्हा मी 13 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या पॉकेटमनीमधील पैसे वाचवून माझ्या बहिणीला बऱ्याच दिवसांपासून एक घड्‌याळ घ्यायचं होतंते घेऊन दिलं. ते पाहून तिला खूप आनंद झाला होता. आजही तिच्याकडे ते घड्‌याळ आहे. आम्ही एकमेकांना खूप चिडवतो आणि त्रास देतो. पण जसे विराट ह्या शोमध्ये आपली बहिण निम्मीसाठी काहीही करू शकतो तसाच मीही माझ्या बहिणीसाठी काहीही करू शकतो. तिला भेटायलातिच्यासोबत राखीचा सण साजरा करायला आणि तिला शॉपिंगसाठी घेऊन जायला मी खूप उत्सुक आहे. तिला अभिमान वाटेल अशा गोष्टी करायला मला खूप आवडतात. तिची मान्यता माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.”

हा सण आपल्या खऱ्या बहिणीसोबत साजरा करण्यासाठी अर्जित उत्साहात असून मालिकेमध्ये त्याची ऑनस्क्रीन बहिण निम्मी (आकांक्षा पाल) त्याला आणि तिची वहिनी अमृतालासुद्धा (सृती झा) राखी बांधताना दिसून येईल कारण घरगुती विवादांमधून तिने तिला वाचवले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला …