no images were found
इंटरनॅशनल कॅट डे निमित्त एण्ड टीव्हीवरील अभिनेत्रींनी त्यांना भेटलेल्या सर्वात मजेदार मांजरींबाबत सांगितले!
यंदा इंटरनॅशनल कॅट डे निमित्त अभिनेत्री त्यांच्या मालिकांच्या सेटवर मांजरींसोबत झालेल्या मजेदार भेटीबाबत सांगत आहे, जेथे त्या मांजरी गुपचूप स्नॅक्स चोरत होत्या, पोशाखांवर दिमाखात आराम करत होत्या आणि शूटिंगदरम्यान सीनमध्ये अचानकपणे आल्या.
या अभिनेत्री आहेत प्रियमवदा कांत (लतिका, ‘घरवाली पेडवाली’), सोनल पनवार (इन्स्पेक्टर मलायका, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी, ‘भाबीजी घर पर है’).
आगामी मालिका ‘घरवाली पेडवाली’मधील प्रियमवदा कांत ऊर्फ लतिका म्हणाल्या, ”मांजर बोलू शकले असते तर कदाचित ते म्हणाले असते ‘या सेटवर माझे राज्य आहे’. प्रामाणिकपणे सांगायचे तर मी देखील त्यांच्या मताला सहमती दिली असती. माझे नेहमी त्यांची मोहकता, स्वावलंबीत्व व काहीशा गूढ वृत्तीने लक्ष वेधून घेतले आहे. आम्ही एकदा बाहेर शूटिंग करत होतो, एक मांजर कॅमेऱ्याच्या बॅगवर बसली होती, जणू काय तिच्यासाठी ते सिंहासन होते आणि ती त्यावरून हटण्यास तयार नव्हती. आम्ही तिला खायला दिले, तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि मजेदार आवाज देखील काढले, पण ती तिथेच बसून राहिली आणि तिच्या नजरेतून ती सांगत होती की ‘ही माझी जागा आहे’. शेवटी, आम्हाला तिला तेथून हटवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. रोचक बाब म्हणजे मी एका आठवड्यापूर्वी घरामध्ये बोक्याला आणले होते आणि तो घराचा राजा बनला आहे. आम्ही त्याचे नाव ‘शेहनशाह’ ठेवले आहे. तो घरामध्ये अनपेक्षितपणे मोहकता व आनंद आणतो, ज्यामुळे मी नेहमी मांजरांचे कौतुक करते.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील सोनल पनवार ऊर्फ इन्स्पेक्टर मलायका म्हणाल्या, ”मला नेहमीच मांजरी खूप रंजक वाटतात. एका क्षणी त्या खेळकर असतात, तर दुसऱ्या क्षणी त्या त्यांच्या जगात पूर्णपणे हरवून जातात. एका शूटदरम्यान एक भटकी मांजर माझ्या जॅकेटवर बसली होती आणि तेथून जात नव्हती. ती माझ्या स्वेटरवर बसली होती, ज्यामुळे मला टीममधील एका सदस्याचा स्वेटर घ्यावा लागला होता! दुसरा प्रसंग असा की आम्ही अतिशय गंभीर सीनचे शूटिंग करत होतो, तेव्हा एक गोंडस छोटी मांजर सीनच्या मध्ये आली आणि मागे जाऊन बसली, जणू तिला कॅमेरा तिच्याभोवती फिरत असल्यासारखे वाटले. सीनचे शूटिंग योग्यरित्या झाले नाही, पण आम्ही सर्वजण खदखदून हसलो. मांजरींबद्दल मला सर्वात जास्त बाब आवडते ती म्हणजे त्या तुमचे लक्ष वेधण्याचा कधीही खूप प्रयत्न करत नाहीत. त्या मोहक दिसतात आणि तुम्ही त्यांच्याकडे पाहताच हसल्याशिवाय राहू शकत नाही.”
मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबी म्हणाल्या, ”मांजर आपसूकच मनोरंजन करतात असे माझे मत आहे. मला आठवते, एका दुपारी शूटिंगदरम्यान मी सीन पाहण्यासाठी माझ्या व्हॅनिटी रूममध्ये गेले आणि तेथे नाश्ता ठेवला होता. मी परत आल्यावर मला एक छोटी मांजर माझ्या खुर्चीवर आरामात बसलेली दिसली, ती आनंदाने माझ्या नाश्ताचा आस्वाद घेत होती. तिने माझ्याकडे अगदी निरागस नजरेने पाहिले, जणू काही ती म्हणत होती, ‘बरं, हे आता माझे आहे.’ मी स्वत:ला हसण्यापासून रोखू शकले नाही आणि नाश्ता खाऊन झाल्यानंतर ती तेथून निघून गेली. मांजरींची ही जादू आहे: त्या तुमच्या जागेत येऊ शकतात, कोणत्याही संकोचशिवाय ताबा घेऊ शकतात आणि तरीही तुम्हाला पूर्णपणे मोहित करू शकतात.”