Home मनोरंजन ६ वर्षांनंतर अजय पूरकर यांचं मालिका विश्वात पुनरागमन

६ वर्षांनंतर अजय पूरकर यांचं मालिका विश्वात पुनरागमन

0 second read
0
0
72

no images were found

६ वर्षांनंतर अजय पूरकर यांचं मालिका विश्वात पुनरागमन

दर्जेदार मालिका आणि सशक्त कथानकाच्या माध्यमातून गेली ५ वर्ष स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन हा एकमेव उद्देश ठेऊन नवनव्या मालिकांच्या निर्मितीला वाहिनीकडून प्राधान्य दिलं जातं. मनोरंजनाच्या प्रवाहात असाच एक नवा विषय घेऊन स्टार प्रवाह वाहिनी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होतेय नवी मालिका नशिबवान. ही गोष्ट आहे गिरीजा नावाच्या मुलीची जिच्या आयुष्यात अनेक आव्हानं आहेत. आई-वडिलांचं प्रेम नाही, लहान वयातच आलेली घरची जबाबदारी आणि जगण्यासाठीचा संघर्ष असं खडतर आयुष्य गिरीजाच्या नशिबी आलंय. मात्र या कठीण प्रवासात ती नशिबवान आहे याचा उलगडा तिला होतो. गिरीजा नशिबवान का आणि कशी ठरते याची गुंफलेली सुंदर गोष्ट म्हणजे नशिबवान मालिका.

सुप्रसिद्ध अभिनेता अजय पूरकर या मालिकेत खलनायक म्हणजेच नागेश्वर घोरपडे ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. नागेश्वर आपल्या पैश्याच्या जोरावर सामान्य माणसांना त्रास देतो. खून करायलाही मागेपुढे बघत नाही. देवीची पूजा करतो. पण राक्षसारखा लोकांचा छळ करतो. इतका क्रुर वागूनही तो कधीच कोणत्या केस मध्ये अडकत नाही. हे खुनशी पात्र साकारणं किती आव्हानात्मक आहे हे सांगताना अजय पुरकर म्हणाले, जवळपास ६ वर्षांनंतर मालिकेत काम करतोय. मला नागेश्वर हे पात्र ऐकताक्षणीच खूप आवडलं. एकतर स्टार प्रवाहसारखी नंबर वन वाहिनी आणि कोठारे व्हिजन्स सारखी निर्मिती संस्था असताना नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. महेश कोठारेंसोबत काम करण्याचं माझं स्वप्न या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होतंय. नागेश्वर या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. या पात्राच्या अनुषंगाने मालिकेची गोष्ट घडणार आहे. याआधी मी इतका प्रभावशाली खलनायक साकारलेला नाही. त्यामुळे नागेश्वर साकारताना अभिनेता म्हणून माझा कस लागणार आहे. तेव्हा नक्की पहा आमची नवी मालिका नशिबवान लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…