Home Uncategorized सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन

सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन

0 second read
0
0
6

no images were found

सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन

कोल्हापूर, : सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘सेवा माझे योगदान’ उपक्रमाद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर यांच्यावतीने जिल्ह्यातील विविध शैक्षणिक व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये करिअर कौन्सिलिंग व उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उपलब्ध संधी, कौशल्य विकासाचे महत्त्व, विविध ट्रेडनुसार करिअरच्या संधी, उद्योग क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये तसेच उद्योजकतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दि. ८ ऑक्टोबर रोजी वीर धनाजी जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हातकणंगले येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा रोजगार मेळावा समितीचे सदस्य भारत सोमैया, सोमैया टेक्नोक्राफ्टचे वरिष्ठ लिपिक रामचंद्र पांढरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महास्वयम पोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी कशी करावी, आस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत अधिसूचित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी अर्ज कसा करावा, याबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास प्रथम व द्वितीय वर्षातील ८० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. संस्थेचे प्राचार्य श्री. मिसाळ, गटनिदेशक श्री. कलगोंडा, श्री. बजबळकर, श्री. सातव, श्री. बेळगावकर उपस्थित होते.

सरसेनापती संताजी घोरपडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुरगूड येथेही करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास द्वितीय वर्षातील ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी संस्थेचे गटनिदेशक श्री. निर्मळे, श्री. साळुंखे तसेच जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक श्री. पराग जोशी उपस्थित होते.

डॉ. डी. एन. पाटील महाविद्यालय, मलकापूर येथे ‘करिअर कौन्सिलिंग आणि उद्योजकता विकास’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास ५४ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अझहरुद्दीन शेख यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी व उद्योजकता विकासाबाबत मार्गदर्शन केले.

सरसेनापती प्रतापराव गुजर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडहिंग्लज येथे ‘कोल्हापूर जिल्ह्यातील रोजगाराच्या संधी व उद्योजकता’ या विषयावर जिल्हा रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष संजय पेंडसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संस्थेतील १६० हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी शिल्प निदेशक एस. एस. गुरव, ए. टी. जगदाळे, अजय पाटील तसेच जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक पराग जोशी उपस्थित होते.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणानंतरच्या रोजगाराच्या संधी, कौशल्यविकास, स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या विविध पर्यायांची माहिती मिळत असून, विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा लाभ घेऊन कौशल्य विकासास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

महालक्ष्मी मंदिरातील कामे वेगाने पूर्ण करा – जिल्हाधिकारी

महालक्ष्मी मंदिरातील कामे वेगाने पूर्ण करा – जिल्हाधिकारी कोल्हापूर : करवीर निवासिनी…