Home सामाजिक ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ तात्काळ लागू करा ! – रक्षाबंधनाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने राखी बांधून लोकप्रतिनिधींना निवेदन  

‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ तात्काळ लागू करा ! – रक्षाबंधनाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने राखी बांधून लोकप्रतिनिधींना निवेदन  

11 second read
0
0
56

no images were found

 

‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ तात्काळ लागू करा ! – रक्षाबंधनाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने राखी बांधून लोकप्रतिनिधींना निवेदन  

 

सांगली (प्रतिनिधी ):- ‘रक्षाबंधन’ हा सण भारतीय संस्कृतीतील पवित्र सण असून, तो भगिनी-भावातील प्रेम, विश्‍वास व रक्षणाच्या वचनाचा प्रतीक आहे. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधून त्याच्याकडून केवळ भौतिक नव्हे, तर चारित्र्य, कुटुंब, धर्म आणि संस्कृती रक्षणाचे वचन घेतात; पण आज दुर्दैवाने हिंदू समाजातील असंख्य भगिनींना स्वतःच्याच रक्षणासाठी सरकार दरबारी साकडे घालावे लागत आहे. ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हिंदू युवतींवर नियोजनबद्ध पद्धतीने फसवणूक, प्रेमाच्याआड पापरलेली कट्टर जिहादी विचारसरणी आणि धर्मांतराची सामाजिक आपत्ती उभी राहिली आहे. ही नुसती सामाजिक नव्हे, तर धार्मिक, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक संकटाची स्थिती आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने विविध लोकप्रतिनिधींना राखी बांधून ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ तात्काळ लागू करावा, या मागणीचे निवेदन देण्यात आले. या राख्या सनातन संस्थेच्या साधिका सौ. सरिता चौगुले, सौ. सुभला तांबडे, श्रीमती दिपश्री जाधव यांनी बांधल्या.

      यात प्रामुख्याने भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार श्री. रवींद्र चव्हाण, जत येथील भाजप आमदार श्री. गोपीचंद पडळकर, तसेच राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री अन् सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रकांत(दादा) पाटील यांचा समावेश होता. राखी बांधल्यावर श्री. गोपीचंद पडळकर यांनी ‘हा कायदा लवकर होईल’, असे आश्‍वासन दिले. याच समवेत ‘कबड्डी असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. नितीन शिंदे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश ढंग, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. सम्राट महाडिक, भाजपचे चिटणीस श्री. किरण कपाले, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. मोहन जामदार यांनाही राखी बांधण्यात आली. या प्रसंगी भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ, भाजपच्या महिला आघाडीच्या अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, सर्वश्री अविनाश मोहिते, आकाश मोहिते, समाधान लोंढे यांसह अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…