Home Uncategorized हिंदु धर्म आणि हिंदू यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात संघटित होण्यासाठी १७ ऑगस्टला हिंदु धर्म परिषदेचे आयोजन !

हिंदु धर्म आणि हिंदू यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात संघटित होण्यासाठी १७ ऑगस्टला हिंदु धर्म परिषदेचे आयोजन !

5 second read
0
0
20

no images were found

हिंदु धर्म आणि हिंदू यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात संघटित होण्यासाठी १७ ऑगस्टला हिंदु धर्म परिषदेचे आयोजन !

कोल्हापूर ( प्रतिनिधी ):- गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार केला जात आहे. मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहे. तेथील लष्कर आणि हंगामी सरकार हिंदूंचे रक्षण करण्यास असमर्थ दिसून येत आहे. भारतातही लँड जिहाद, लव्ह जिहाद, गोहत्या अशा समस्या सातत्याने वाढत असून युवतींचे गायप होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गोहत्येचा कायदा असूनही अनेक ठिकाणी गोरक्षकांवर हल्ले होत आहेत, गायींची कत्तल होत आहे. ‘वक्फ’द्वारे हिंदूंच्या जमिनी बळकावण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे एकूणच हिंदु धर्म, हिंदू यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात संघटित होण्यासाठी १७ ऑगस्टला हिंदु धर्म परिषद आयोजित केली आहे. ही परिषद शाहू स्मारक येथे सकाळी १० वाजता प्रारंभ होईल, अशी माहिती सकल हिंदू समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजाजन तोडकर, सकल हिंदू समाजाचे श्री. अभिजित पाटील आणि श्री. विकी जरग, श्री. वाघापूरकरदादा, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शिवसेनेचे श्री. अर्जुन आंबी, मराठा तितुका मेळवावा संघटनेचे श्री. योगेश केरकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, मराठा व्यावसायिक संघटनेचे श्री. प्रसन्न शिंदे यांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या सभेत ‘हिंदुत्व’ याविषयावर सद्गुरु संतोष तथा बाळ महाराज, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व आणि आजचे वास्तव’ यावर प्रा. राजेंद्र ठाकूर यांचे, ‘हिंदु धर्मावर होणारे विविध आघात आणि लव्ह जिहाद’ यावर सनातन संस्थेच्या संत सद्गुरु स्वाती खाडये या मुख्य वक्त्यांचे, तसेच अन्य मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. या धर्मपरिषदेचे औचित्य साधून आई अंबाबाई, आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन देव, देश आणि धर्म हिताचे १५ ठराव संमत केले जाणार असून हिंदु धर्म रक्षणाची शपथ घेतली जाणार आहे. या परिषदेसाठी संत, हिंदु धर्मगुरु उपस्थित रहाणार आहेत.

कोल्हापूर येथे विशाळगडच्या संदर्भात नुकताच जो उद्रेक झाला, त्याला गडावरील अतिक्रमण कारणीभूत असतांना केवळ एकतर्फी शिवप्रेमींवरच गुन्हे दाखल करण्यात आले. देशात श्रीराम नवमी, हनुमानजयंती, बंगालमध्ये दुर्गा मिरवणुकीत आक्रमणे केली जात आहेत, साधू-संत यांच्यावर खोटे आरोप केले जात असून देवतांविषयी अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. अल्पवयीन अल्पसंख्यांक समाजातील युवकांना पुढे करून हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांचा सामाजिक माध्यमांद्वारे अवमान केला जात आहे आणि मोठ्या प्रमाणात सामाजिक तेढ निर्माण केल्याच प्रयत्न केला जात आहे. हजारो हिंदूंची हत्या करणारा टीपू सुलतान, औरंगजेब याचे उदात्तीकरण करण्याचा डाव चालू आहे. या सर्वांवर उपाय म्हणून हिंदूंनी संघटित होणे, त्यांना धर्मशिक्षण मिळणे अत्यावश्यक झाले आहे. यापुढील काळात हिंदूंवर अन्याय झाल्यास हिंदू शांत बसणार नाही, तर प्रत्युत्तर दिले जाईल. तरी प्रत्येक हिंदूंने धर्मकर्तव्य म्हणून या धर्मपरिषदेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल हिंदू समाज कोल्हापूरच्या वतीने करण्यात येत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया– प्रकाश आबिटकर

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया– प्रकाश आबिटकर   कोल्हाप…