no images were found
खरेदी प्रकरणात अनियमितता आढळल्याने उच्चस्तरीय चौकशीचे संचालकांचे शासनास पत्र
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर व संलग्नित रुग्णालय येथील सर्जिकल विभागात शस्रक्रियेकरिता आवश्यक असलेल्या साधनसामुग्री खरेदीप्रकरणात अनियमितता असलेबाबतचे वृत्त १८ जुलै २०२४ च्या दैनिक लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली होती. संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई विभागाकडून दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी या प्रकरणाची चौकशी करण्याकरीता समिती स्थापन करण्यात आली होती. समितीमार्फत चौकशी झाली असून या खरेदीप्रकरणात अनियमितता व गैरव्यवहार असून संबधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, असे पत्र मुंबई वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलिप म्हैसेकर यांनी शासनास दिले आहे.
समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये पुढील नोंदी दिलेल्या आहेत. खरेदी करताना विभागाने दिलेली मागणी ही अतिरिक्त दिसून येते व त्यामुळे अनेक बाबींची अतिरिक्त खरेदी झाली आहे असे दिसून येते. उदा. सुरुवातील ड्रेसिंग मटेरियल 45 हजार (पंचेचाळीस हजार) नगचा पुरवठा झाला असल्याचे दिसून येते त्यापैकी 38 हजार 300 (अडतीस हजार तीनशे) एवढे नग सर्जिकल भांडार विभागात उपलब्ध आहेत असे आढळून आले आहे. सर्जिकल भांडार प्रमुख यांनी भांडारात या बाबींचा साठा किती प्रमाणात आहे याची पडताळणी करुन आवश्यकतेनुसार मागणी करणे आवश्यक होते. संबंधित सर्जिकल साहित्य खरेदी ही ESIS हॉस्पिाटल, मुलूंड यांच्यामार्फत Coloplast India Pvt.Ltd. दर करारानुसार केल्याचे दिसून येत आहे. परंतु, ESIS हॉस्पि्टल मुलूंड यांच्या दर कराराची प्रत सादर केल्याचे दिसून येत नाही. सर्जिकल साहित्याचे दर हे वाजवी भावापेक्षा जास्त असल्याने ती बाजारभावानुसर तपासणी करुन घेणे आवश्यक होते. विविध विभागाने दिलेली मागणी ही तांत्रिक दृष्टीने रितसर आहे किंवा कसे? याबाबत संबंधित विभागप्रमुख यांनी तपासणी करणे आवश्यक होते. संबंधित पुरवठदार हे शासनाच्या दरपत्रकावर होते का? ही बाब तपासणी करण्यात आल्याचे दिसून येत नाही. तसेच या सर्व तांत्रिक बाबी संबंधित संस्थेने जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना अवगत करणे आवश्यक होते. ESIS हॉस्पिभटल, मुलुंड यांनी MGH/ESIS/CS/1107-18/2022 दिनांक 27.9.2022 या दरकरार पत्राची सत्यता पडताळणी केली असता हे पत्र या कार्यालयाचे अधिकृत पत्र नाही असे कळविले आहे. वरील सर्व बाबी तपासल्या असता हा दर करार हा ESIS रुग्णालयाचा नाही ही बाब गंभीर आहे तसेच यात अनियमितता व गैरव्यवहार दिसून येत आहे.