no images were found
प्रभू श्रीराम आणि रावण आमने-सामने
12 ऑगस्टपासून सोनी सब वरील श्रीमद् रामायणमध्ये मोठा बदल होणार आहे. या पौराणिक मालिकेच्या प्रेक्षकांना प्रभू श्रीराम आणि रावणादरम्यानचे परमोच्च बिंदुला पोहोचलेले युद्ध पाहता येईल. हा एपिसोड प्रचंड अॅक्शन सीन्सचा अससेल. जसे जसे युद्ध पुढे जाईल तसा राम राज्याचा मार्ग अधिक प्रशस्त होत जातो. श्रीमद् रामायणात प्रभू श्रीराम आणि सीता एकत्र आल्यावर तसेच अयोध्येला परतल्यावर काय होते, यासंबंधी काही कमी माहिती असलेल्या कथांवर आम्ही प्रकाश टाकणार आहोत.
ही कथा पुढे जाण्यापूर्वी सोनी सबवर प्रीमियर एपिसोडमध्ये राम आणि रावणादरम्यानचे अखेरचे युद्ध दाखवले जाईल. हा महाएपिसोड म्हणजे एक व्हिज्युअल ट्रीट असेल. यात काही चांगले तर काही वाईट असे.. संघर्षातील अनेक मनोरंजक अनुभव दाखवले जातील. प्रेक्षकांना हाय ऑक्टेन अॅक्शन, शानदार व्हिज्युअल इफेक्ट्स आणि एक मनोरंजक कथा पहायला मिळेल. यातून ही पौराणिक कथा जिवंत केली जाईल. हा एपिसोड केवळ एका भयंकर शारीरिक युद्धासंबंधी नाही तर रामाचा दृढ संकल्प, धार्मिकता आणि कर्तव्य हे गुण जास्त ठळकपणे दाखवले जातील. या दरम्यान पात्रांचा गहन संवाददेखील आहे. तर दुसरीकडे, रावणाचा दुर्जेय आत्मविस्वास, दृढ संकल्प आणि अहंकार दर्शवण्यात आला आहे.
रामाची भूमिका करणारा सुजय रे म्हणाला, ‘या ऐतिहासिक युद्धात भगवान रामाचे पात्र साकारणे, हा खूप अविश्वसनीय अनुभव होता. या एपिसोडमध्ये धार्मिकतेचे सार आणि त्यातून मिळणाऱ्या ताकतीचे सुंदर वर्णन केले आहे. या भूमिकेची तयारी करण्यासाठी रामाची धर्माप्रती असलेली प्रतिबद्धता सखोल अभ्यासणं गरजेचं होतं. हे सगळं पडद्यावर आणणं माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब होती. अॅक्शन सिक्वेन्स करणं नेहमीच आव्हानात्मक असतं. असे सीन करण्यासाठी खूप रिहर्सल आणि कोरियोग्राफी लागते. हा खरोखरच खूप रोमांचक अनुभव होता.”
रावणाची भूमिका करणारा निकितिन धीर म्हणाला,‘रावण हे एक जटील पात्र आहे. रामायणातले युद्ध महत्त्वाचे आहे. रावणाचे शक्तिशाली व्यक्तिमत्तव आणि भयंकर युद्ध कौशल्य जीवंत करणे आव्हानात्मक होते तसेच रोमांचकदेखील होते. रावणाची प्रतिभा आणि गर्व या दोन्हींचे जटिल मिश्रण समजून घेणे आवश्यक होते. रामासोबत त्याचे भयंकर युद्ध चित्रत करणं, हा सुद्धा एक भाग्याचा अनुभव होता. अॅक्शन सिक्वेन्स करताना रियल टाइममध्ये काम करावे लागते. त्यामुळे आम्हाला खूप रिहर्सल कराव्या लागल्या. असे सीक्वेन्स करणं सोपं नसतं. मात्र ही मेहनत तर घ्यावीच लागणार होती… ’