no images were found
सेटवर सुमित राघवन आपल्या सह कलाकारांना सुग्रास जेवण तयार करून त्यांना खुश करतो…
सोनीसबवर प्रसारीत होणारी मालिका ‘वागले की दुनिया-नई पीढी नए किस्से’ ही मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये खूप लोकप्रिय ठरत आहे. विशेष म्हणजे, या मालिकेद्वारे दैनंदिन जीवनात येणारी भावनिक आव्हाने दाखवली जातात. यातून मिळणारे धडे अत्यंत हृदयस्पर्शी स्वरुपात सादर केले जातात. वागळे परिवाराचा दैनंदिन संघर्ष आणि यश दाखवल्यामुळेच ही मालिका टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका ठरत आहे.
राजेश वागळेचे सर्वाधिक लोकप्रिय पात्र साकारणारा सुमित राघवन हा चाहत्यांसोबतच सेटवरील सहकलाकार आणि क्रू मेंबर्सच्या आवडता आहे. नुकतीच एक माहिती समोर आली आहे की, सुमित फक्त मालिकेतच प्रभावी ठरत नाही तर पडद्यामागे आपल्या पाक कौशल्याने सहकलाकार आणि क्रू सदस्यांनाही खूश करतो. सुमितने मेकअप रुममध्ये एक इंडक्शन स्टोव्ह ठेवला आहे. जेव्हा मूड असतो, किंवा कलाकारांना खाण्याची इच्छा होते, तेव्हा तो सगळ्यांसाठी पदार्थ बनवतो. त्याने केलेले इन्स्टांट फूड क्रू सदस्यांना नेहमीच आवडतात. त्यामुळे सुमितचे स्वयंपाकाचे कौशल्य हे त्याच्या अभिनयाप्रमाणेच सर्वांना आवडते, हे स्पष्ट होते.
या कौशल्याविषयी बोलताना सुमित राघवन म्हणाला,‘तुम्हाला माझ्या मेअकप टेबलवर नेहमीच किचन सेटअप दिसेल. माझे मित्र आणि सहकलाकारांसाठी पदार्थ बनवायला मला खूप आवडते. त्यांच्यासोबत एक आनंद आणि उत्साह शेअर करण्याची ही माझी पद्धत आहे. मला बऱ्याच वेळा पदार्थ करायला आवडतं. अर्थात बऱ्याच वेळा पदार्थ करताना चूक होते, हे मी मान्य करतो. परिवा, चिन्मयी, भारती मावशी, हर्षद आणि इतर लोकही आपापल्या फर्माईशी सांगतात. फ्रेंच टोस्ट आणि ऑमलेटपासून बर्गर… जसा मूड असेल तसं मी करत असतो.. त्यांच्या प्रतिक्रिया पाहणं आणि शूटिंग दरम्यान त्यंच्यासोबत मजा-मस्ती करायला मला खूप आवडते.’