Home मनोरंजन नवीन खलनायकः खलनायकाच्या रूपात ‘कुमकुम भाग्य’मध्ये आरूष श्रीवास्तवचा प्रवेश

नवीन खलनायकः खलनायकाच्या रूपात ‘कुमकुम भाग्य’मध्ये आरूष श्रीवास्तवचा प्रवेश

9 second read
0
0
32

no images were found

नवीन खलनायकः खलनायकाच्या रूपात ‘कुमकुम भाग्य’मध्ये आरूष श्रीवास्तवचा प्रवेश

झी टीव्हीवरील ‘कुमकुम भाग्य’ ने आपल्या रोचक आणि नाट्‌यमय कथानकासह प्रेक्षकांना नेहमीच आपल्या खुर्चीला खिळवून ठेवले आहे. आता ह्या मालिकेत लोकप्रिय अभिनेता आरूष श्रीवास्तवच्या येण्याने आणखी रोमांच फुलणार आहे. आरूष ह्या मालिकेत साहिल ह्या खलनायकी भूमिकेत दिसून येईल. आरूषची व्यक्तिरेखा ह्या कथेला उलटपालट करेल. आपल्या प्रेयसीसाठी बदला घेण्याच्या इराद्याने तो पूर्वी (राची शर्मा) आणि राजवंश (अब्रार काझी) यांच्या आयुष्यात शिरला आहे.

‘कुमकुम भाग्य’चा हिस्सा बनताना आरूष अतिशय उत्साहात असून ह्या मालिकेतील लोकप्रिय कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत काम करताना त्याला खूप मजा येत आहे. तो काही पहिल्यांदा खलनायकाची भूमिका साकारत नसला तरी ह्या खलनायकी व्यक्तिरेखेचे कंगोरे तपासून पाहण्यासाठी आणि आपल्या भूमिकेला संपूर्ण न्याय देण्यासाठी तो सज्ज आहे.

आरूष श्रीवास्तव म्हणाला, मी काही पहिल्यांदा खलनायकाची भूमिका करत नाहीये पण माझी ही व्यक्तिरेखा साहिलचा आपलाच असा मिजाज आहे. ह्या मालिकेतील उत्तम कलाकारांसोबत काम करण्याबद्दल मी उत्साहात आहे. त्यांनी अतिशय प्रेमाने माझे स्वागत केले. अब्रारराचीसृष्टीसोबत काम करताना मजा येतेय. आमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री यांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि आम्ही धमाल करतोय. मला वाटतं मला नेहमीच खलनायकी भूमिकाच अधिक खुणावत आल्या असून मला त्या अतिशय रोचक वाटतात कारण त्यात अनेक स्तरमनसुबे आणि जटिलता असतात. मला खात्री आहे की माझ्या प्रवेशामुळे प्रेक्षक अनपेक्षित गोष्टींची अपेक्षा करू शकतात आणि त्यामुळे ते कथानकाला नक्कीच खिळून राहतील.”

ह्या मालिकेतील प्रवेशाबद्दल आरूष उत्साहात असून प्रेक्षकांसाठी हे पाहणे रोचक ठरेल की कसा जस्सी (विशाल सोलंकी) साहिलला आरव्हीच्या विरोधात भडकवेल कारण त्याच्यावर साहिलची प्रेयसी नेहा (आरूषी हांडा) हिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. काय पूर्वी त्याच्या मनातील ही गैरसमजूत दूर करू शकेल? की साहिल त्याच्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होईल?

Load More Related Articles

Check Also

कोल्हापूर डाक विभागामार्फत जिल्ह्यात 1 मे पासून “ज्ञान पोस्ट” सेवा सुरु

कोल्हापूर डाक विभागामार्फत जिल्ह्यात 1 मे पासून “ज्ञान पोस्ट” सेवा सुरु  …