Home मनोरंजन रघुवीर चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

रघुवीर चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

2 second read
0
0
31

no images were found

रघुवीर चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

 

समर्थ रामदास स्वामींचं जीवनचरीत्र रुपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. ‘रघुवीर’ हा आगामी चित्रपट खऱ्या अर्थाने प्रभू श्रीराम भक्त आणि समर्थ रामदास स्वामींच्या अनुयायांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. ‘रघुवीर’ या चित्रपटाद्वारे प्रथमच रामभक्त समर्थांचं जीवन जगासमोर येणार आहे. या चित्रपटाचा मनमोहक आणि उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाची झलक पाहिल्यानंतर ‘रघुवीर’बाबतची उत्कंठा शिगेला पोहोचते. २३ ऑगस्ट रोजी ‘रघुवीर’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

डायनॅमिक प्रोडक्शन्स आणि आदित्यम क्रिएशन्सच्या सहयोगानं समर्थ क्रिएशन्स यांनी ‘रघुवीर’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे निर्माते अभिनव विकास पाठक, तर सहनिर्माते वैभव किशोर मानकर, सपना किरण बडगुजर आणि डॉ. किरण छगन बडगुजर आहेत. ‘रघुवीर’चे मार्केटिंग पार्टनर खुशी अॅडव्हरर्टायझिंग आयडियाज प्रा. लि. आहेत. सिनेपोलिस या चित्रपट वितरण समूहाच्या माध्यमातून ‘रघुवीर’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. निलेश अरुण कुंजीर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. समर्थ रामदास स्वामींची भूमिका विक्रम गायकवाड यांनी साकारली आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘रघुवीर’च्या ट्रेलरच्या सुरुवातीला ‘रामाला शोधायला निघालोय’, असं म्हणत किशोरावस्थेतील नारायणची ओळख करून देण्यात येते. बालपणापासूनच संसाराच्या मोहातून मुक्त असलेला नारायण लग्नमंडपात भटजींनी ‘शुभलग्न सावधान…’ असं म्हणताच खऱ्या अर्थाने ‘सावध’ होतो आणि थेट मंडपातूनच पळ काढतो. त्यानंतर जलाशयातून प्रभू श्री रामारायाची मूर्ती घेऊन दासोपंत असलेल्या रामाच्या दासाची एन्ट्री ट्रेलरमध्ये होते. रामाची गुलामी पत्करलेले दासोपंत आणखी कोणाची गुलामी करायला तयार नसल्याचे बादशाहाला निक्षून सांगतात. ‘सुदृढ शरीर हाच खरा दागिना’ आणि ‘देव दगडात नसून, मनात असतो’, अशी शिकवण देणारे समर्थ रामदास स्वामी ‘जय जय रघुवीर समर्थ’ हा मंत्र जपत प्रगटतात. याच मंत्राने ‘रघुवीर’च्या ट्रेलरचा उत्कंठावर्धक शेवट होतो. हा ट्रेलर खऱ्या अर्थाने ‘रघुवीर’ चित्रपटाची झलक दाखवणारा आहे. याबाबत कुंजीर म्हणाले की, ‘रघुवीर’ चित्रपटाची थोडक्यात ओळख करून देणारा तसेच रुपेरी पडद्यावरील समर्थ रामदास स्वामींचे दर्शन घडवणारा ट्रेलर प्रेक्षकांना नक्कीच आवडणारा आहे. चित्रपटाची कथा फार रिव्हील न करता रामदास स्वामींच्या व्यक्तिमत्त्वातील तीन वेगवेगळ्या वयातील रूपांची झलक ट्रेलरमध्ये दिसते. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येईल तसतशा ‘रघुवीर’मधील इतर गोष्टीही प्रेक्षकांना समजतील. खऱ्या अर्थाने जगाला मानवतेचा धर्म शिकवत मनाच्या उपासनेचे सोपे साधन जनमानसाला देणाऱ्या समर्थांचे आॅनस्क्रीन रूप त्यांच्या अनुयायांना तर आवडेलच, पण सर्वसामान्य प्रेक्षकांनाही मोहिनी घालेल अशी आशा कुंजीर यांनी व्यक्त केली.

 

समर्थ रामदास स्वामी यांचं चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे तसेच त्यांनी केलेले कार्य यापुढेही अविरतपणे चालूच राहावे यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात यावी अशी निर्माता अभिनव पाठक यांची इच्छा होती. त्यानुसार अथक परिश्रम घेऊन ‘रघुवीर’ सिनेमा बनवण्यात आला आहे. अभिराम भडकमकर यांच्या साथीने दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. अभिराम भडकमकर यांनी संवादलेखनही केलं असून सचिन सुहास भावे कार्यकारी निर्माते आहेत. विक्रम गायकवाड यांच्या जोडीला या चित्रपटात ऋजुता देशमुख, नवीन प्रभाकर, शैलेश दातार, राहुल मेहेंदळे, विघ्नेश जोशी, निनाद कुलकर्णी, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, देव निखार्गे, गणेश माने आदी कलाकारही आहेत. गीतकार मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार अजित परब यांनी स्वरसाज चढवला आहे. सिनेमॅटोग्राफी धनराज सुखदेव वाघ आणि प्रथमेश नितीन रांगोळे यांनी, तर संकलन जागेश्वर ढोबळे आणि प्रशांत चंद्रकांत कांबळे यांनी केलं आहे. या सिनेमाचे चित्रीकरण जव्हार, राजस्थान, मनाली या ठिकाणी करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…