no images were found
रस्ते पॅचवर्कची कामे गणेश उत्सवापुर्वी पूर्ण करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी
कोल्हापूर : गणेश उत्सव 2024 च्या अनुषंगाने शहरातील रस्त्यांचे पॅचवर्कची कामे गणेश उत्सवापुर्वी पुर्ण करण्याच्या सूचना प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी शहर अभियंता यांना दिल्या. आयुक्त कार्यालयात गणेश उत्सवाच्या पुर्व तयारीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये शहर अभियंता यांनी चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत पॅचवर्कच्या कामाचे नियोजन करण्यात आले असून लवकरच पॅचवर्कच्या कामाला सुरवात करणार असलेचे शहर अभियंता यांनी सांगितले. घरगुती व सार्वजनिक गणपती ठिकठिकाणी ठेवलेल्या कुंडापासून इराणी खणीपर्यंत नेण्यासाठी 178 टॅम्पो व 715 हमालासह व्यवस्था करण्यात येत असलेचे सहा.अभियंता यांत्रिकी यांनी सांगितले.
प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने ज्या काही निविदा प्रक्रिया करावयाच्या आहेत त्या तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना सर्व संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. श्री गणेश आगमन, मिरवणूक मार्ग व विर्सजन ठिकाणी लाईट बंद असलेस ती तातडीने सुरु करण्याच्या सूचना दिल्या. ज्या ज्या ठिकाणी मंडप व बॅराकेटींगची आवश्यकता आहे त्या ठिकाणी वार्षिक ठेकेदारामार्फत काम करुन घेण्याच्या सूचना दिल्या. विभागीय कार्यालय व आरोग्य स्वच्छता विभाग यांनी विशेष स्वच्छता मोहिम राबवून खरमाती व कचरा उठाव करावा. रस्त्यावरील मांडव घालण्यास परवानगी देताना वाहतूकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्या. मागिल वर्षीप्रमाणे याही वर्षी विर्सजनाचे नेटके नियोजन करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहा.आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता सतीश फप्पे, आर.के.पाटील, रमेश कांबळे, सहा.अभियंता यांत्रिकी दाभाडे, पर्यावरण अधिकारी अवधूत नर्लेकर, कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर उपस्थित होते.