no images were found
डीकेटीई एम.बी.ए. च्या ३७ विद्यार्थ्यांची डि – मार्ट मध्ये निवड
इचलकरंजी (प्रतिनिधी): डीकेटीईच्या एम.बी.ए. विभागातर्फे डि-मार्ट या कंपनीतर्फे पूल कॅम्पस आयोजित करण्यात आले होते. या कंपनीच्या प्लेसमेंटसाठी सहा महाविद्यालयातील सुमारे १३१ विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते. यामध्ये डीकेटीईच्या एमबीए विभागाच्या ३७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना डिपार्टमेंटल मॅनेजर या पोस्टसाठी निवड झाली आहे.
डीकेटीई मध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी वेळोवेळी कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन केले जात असून सर्व अध्यापक वर्ग व ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफीसर यांच्या वैयक्तिक मार्गदर्शनामुळे गुणवत्ता वाढविण्यासाठी मदत होत असते. या व्यतिरिक्त विविध तज्ञ मान्यवरांचे नोकरी संदर्भात कार्यशाळा देखील आयोजित केल्या जातात. तसेच डीकेटीईतील एमबीए विभागामध्ये इंडस्ट्री इन्स्टिटयूट इंटरॅक्शन साठी ब-याच इंडस्ट्री शी सामंजस्य करार झालेले आहेत त्यांचा फायदा विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकासासाठी होत आहे.
डि-मार्ट ही रिटेल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून तिचे देशभरात ३४० डिपार्टमेंटल स्टोअर्स आहेत. डीमार्टतर्फे बाला शेलार, रिजनल एचआर महाराष्ट्र, आणि क्लीफोर्ड फ्रॅन्सीस, सर्कल हेड, ऑपरेशन्स यांनी दोन फे-यामध्ये विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली. पहिल्या फेरीमध्ये ऍप्टीटयूट टेस्ट घेवून ११७ विद्यार्थ्यांना निवडण्यात आले दुसरी फेरीमध्ये मुलाखती घेवून डीकेटीईच्या ३७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या निवडीबदल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आण्णा आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्र. संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख प्रा.पी.एस. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. सदरच्या प्लेसमेंटसाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफीसर ए.एस.गणपते यांनी विशेष परिश्रम घेतले.