no images were found
डीकेटीईच्या तब्बल ७८० हून अधिक विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड
इचलकरंजी (प्रतिनिधी) – डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मधील सन २३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये तब्बल ७८० हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीची उत्तम पॅकेजवरती संधी उपलब्ध करुन दिलेली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये टेक्स्टाईल, सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन आणि अर्टिफिशिएल इंटेलिजिएन्स विभागातील विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यामध्ये ४५ लाख, २५ लाख, २२ लाख, १८.७ लाख, १८ लाख, १७ लाख, १२ लाख या भरघोस पॅकेजसह विविध नामांकित कंपनीत निवड झाली आहे.
डीकेटीईच्या टेक्स्टाईलमधील १२ विद्यार्थ्यांची १८ लाख पॅकेजवरती तर ९ विद्यार्थ्यांची १७ लाख पॅकेजवरती फॉरेन प्लेसमेंट झाले आहे. २९ विद्यार्थ्यांची ८ लाखाहून अधिक पॅकेजसह इमर्सन, नॉर ब्रॉन्से, टीसीएस डिजीटल अशा कंपन्यामध्ये निवड झाली आहे. याचबरोबर सुमारे ७५ हून अधिक विद्यार्थ्यांना ६ ते ८ लाखाच्या पॅकेजवरती निवड झाली आहे. ऍवरेज पॅकेज ६.५ लाखापर्यंत प्राप्त झाले आहे. डीकेटीईतील विद्यार्थी दरवर्षी सुटटी च्या काळात महिना भरासाठी देशविदेशात प्रशिक्षणासाठी जातात. कांही विद्यार्थ्यांना यासाठी स्टायपंड देखील मिळते. या वर्षी एकूण १७५ हून अधिक विद्यार्थ्यांची प्री प्लेसमेंट द्वारे निवड झाली आहे.
डीकेटीईमध्ये १५५ हून अधिक कंपन्या २०२३-२४ मध्ये कॅम्पस इंटरव्हयूसाठी आलेल्या होत्या. त्या मध्ये टेक्स्टाईलसाठी ट्रायडेंट, इपिक, रिलायन्स, अरविंद, वर्धमान इ. तर इंजिनिअरींगमध्ये टीसीएस, कॅपजेमिनी, इमर्सन, नॉर बे्रनसे, टीसीएस डिजीटल, रिया ऍडव्हसयरी, टाटा टेक्नॉलॉजी, अदानी, जॉन्सन कंट्रोल, थरमॅक्स, हुनरटेक, विप्रो, भारत फोर्ज, परसिस्टंट, प्रिसीएंट सिक्युरिटी, इटुओपन, रोहन बिल्डर्स, एस.जे.कॉन्ट्रॅक्ट,ऍजीले व्हेनचर्स इ. अशा आघाडीवरच्या मल्टीनॅशनल कंपन्याचा सहभाग होता. २०२३-२४ मध्ये एकूण १५५ हून अधिक कंपन्यानी डीकेटीईस कॅम्पस प्लेसमेंटसाठी भेट दिली व ७८० विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हयू मधून निवड केली आहे. डीकेटीई मध्ये सॉफटस्कील, टेक्नीकल स्कील, ट्रेनिंगप्रोग्राम,ऍप्टीटयूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन याव्दारे विद्यार्थ्यांची प्लेसमेंटसाठी ची तयारी वर्षभर करुन घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थी यात प्रविण होतात व यश मिळवतात. जागतिकीकरण आणि स्पर्धात्मक युगात सक्षम अभियंत्याची गरज आहे ही गरज ओळखून डीकेटीई संस्थेने विद्यार्थ्यांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत यामुळेच डीकेटीईने प्लेसमेंट मध्ये भरारी घेतलेली आहे.
सदर सर्व विद्यार्थ्यांस संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी निवडीबददल शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना प्रभारी संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यू.जे.पाटील, सर्व विभागप्रमुख, ट्रेनिंग ऍण्ड प्लेसमेंट ऑफीसर प्रा. एस.बी.अकिवाटे, प्रा.जी.एस.जोशी याचे मार्गदर्शन लाभले आहे.