Home सामाजिक जावा येझ्दी मोटरसायकल्सतर्फे कोल्हापूरमध्ये मेगा सर्व्हिस कॅम्पचे आयोजन

जावा येझ्दी मोटरसायकल्सतर्फे कोल्हापूरमध्ये मेगा सर्व्हिस कॅम्पचे आयोजन

6 second read
0
0
23

no images were found

जावा येझ्दी मोटरसायकल्सतर्फे कोल्हापूरमध्ये मेगा सर्व्हिस कॅम्पचे आयोजन

 

कोल्हापूर : जावा येझ्दी मोटरसायकल्स आपला यशस्वी मेगा सर्व्हिस कॅम्प कोल्हापूर, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या टप्प्यात राज्यभरात सर्व्हिस कॅम्पच्या यशस्वी आयोजनानंतर दुसऱ्या टप्प्यात हे कॅम्प इतर शहरांमध्ये घेतले जाणार आहे. ७ आणि ८ जून रोजी हा कॅम्प कोल्हापूर येथे होणार असून त्यादरम्यान २०१९- २०२० मॉडेल्सच्या जावा मोटरसायकल ग्राहकांना सेवा दिली जाणार आहे.हा सर्व्हिस कॅम्प पुढील ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे:

o   सी एम व्हील्स सीएस क्रमांक २०२/३ अथर्व आयकॉन, वेस्टसाइड मॉलच्या बाजूला, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर, महाराष्ट्र ४१६००३.

या कॅम्पमध्ये २०१९- २०२० मॉडेल्सच्या जावा मोटरसायकल ग्राहकांना त्यांच्या गाडीची संपूर्ण तपासणी आणि निवडक भागांचे मोफत रिप्लेसमेंट करून मिळेल. आघाडीचे ओरिजनल इक्विपमेंट पुरवठादार या कॅम्पमध्ये सहभागी होऊन ग्राहकांची मदत करणार असून त्यात मोतुल, अमारॉन, सीएट टायर्स यांचा समावेश आहे. ग्राहकांना दीर्घकालीन सेवा देण्याच्या बांधिलकीतून जावा येझ्दी मोटरसायकल्सने मोटरसायकलच्या मूल्यांकनावरून मोफत वाढीव वॉरंटी देण्याचे ठरवले आहे. त्याशिवाय एक्सचेंज मूल्य जाणून घेत अपग्रेडिंगमध्ये रस असलेल्या ग्राहकांसाठी ग्राहकांसाठी खास झोन तयार केला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यातील सर्व्हिस कॅम्पमध्ये ६२५० जावा मोटरसायकल्सचे सर्व्हिसिंग करण्यात आले असून या यशावर पुढील कॅम्प्सचे आयोजन करण्यात येत आहे.यापुढे जावातर्फे (दुसरा टप्पा) येत्या काही महिन्यांत देशभरातील विविध शहरांत कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे. या उपक्रमातून ब्रँडची ग्राहक समाधानाला प्राधान्य देण्याची बांधिलकी आणि त्यांना ओनरशीपचा अनोखा अनुभव देण्याचा प्रयत्न अधोरेखित झाला आहे.जावा येझ्दी मोटरसायकल्सच्या ग्राहकांना त्यांच्या जवळच्या ब्रँड वितरकाकडे आपला स्लॉट राखून ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. आपल्या मोटरसायकलचे दर्जेदार सर्व्हिसिंग करण्याची व सर्वोच्च ग्राहक समाधान मिळवण्याची ही संधी चुकवू नये.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…