
no images were found
आयुष्मान कार्ड’ योजनेत होणार मोठे बदल!
सरकारने भारतीयांसाठी अनेक योजना आणलेले आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत कार्ड योजना. या योजनेअंतर्गत देशातील गरीब घटकातील नागरिकांना मोफत उपचार दिले जातात. आता आयुष्यमान कार्ड असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता या योजनेत मोठे बदल होणार आहे. त्यामुळे आता मध्यमवर्गीय लोकांना देखील त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चालू झालेली आता पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत. या योजनेचा आतापर्यंत दहा कोटी लोकांनी लाभ घेतलेला आहे. तसेच पाच लाखांपर्यंत उपचार या योजनेअंतर्गत फ्रीमध्ये मिळतात. परंतु आता पाच वर्षानंतर सरकारी या योजनेत मोठी मोठे बदल करण्याची तयारीत आहे.
येणाऱ्या काळात या आयुष्मान योजनेची व्याप्ती आणि त्याचे पॅकेज देखील बदलणार आहे. यानुसार आता विशिष्ट वयामध्ये नुसार गरीब आणि श्रीमंत प्रत्येकाला हा लाभ दिला जाईल. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील या योजनेत सुधारणा करण्याचे सल्ला दिलेला आहे. सध्या देशातील अनेक रुग्णालय हे ही या आयुष्मान योजनेअंतर्गत जोडलेली आहे. त्यामुळे आता या छोट्या शहरातील रुग्णालयांचा देखील या योजनेमध्ये समावेश केला जाणार आहे. जेणेकरून लोकांना उपचार लवकर मिळतील आणि जवळ मिळतील. या योजनेअंतर्गत सध्या पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. परंतु ही रक्कम आता 7 ते 10 लाख रुपयापर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या योजनेअंतर्गत रुग्णालयातील बिले लगेच भरण्यासाठी नवीन प्रणाली देखील विकसित केली जाणार आहे. अशी कोणतीही पेमेंट सिस्टीम विकसित करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आता या योजनेची व्याप्ती देखील वाढणार आहे. योजनेचा सगळ्यात मोठा फायदा हा वृद्धांसाठी होण्याची शक्यता आहे. असे मानले जाते की, 70 पेक्षा जास्त वयाच्या लोकांना या योजनेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. जेणेकरून वृद्धांना देखील रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळू शकतील.