
no images were found
अनुसुचित जातीतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत
कोल्हापूर: सन 202425 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांसाठी शासन स्तरावरुन https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळावर दि. 25 जुलै 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलीआहे.जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रलंबित असणाऱ्या अर्जांची छाननी करुन परीपुर्ण अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, सचिन साळे यांनी केले आहे.
सन 2024 25या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयांमध्ये शिकत असणाऱ्या अनुसूचित जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांचे अर्ज महाडिबीटी या ऑनलाईन प्रणालीवरुन भरण्यासाठी सुचित करावे. सन 2023 -24 या शैक्षणिक वर्षातील अजूनही ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज नुतनीकरण करायचे राहिले असतील, अशा विद्यार्थ्यांनी अर्जांचे नुतनीरकण करावे, असेही श्री. साळे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.