no images were found
सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनरीद्वारे आज 59 मॅनहोल चेंबर साफ
कोल्हापूर : पूराचे पाणी ओसणा-या भागामध्ये व शहरातील मुख्य रस्तेवरील चेंबर लाईन महापालिकेच्यावतीने युध्दपातळीवर साफ सफाई करण्यात येत आहे. शहरामध्ये आज सोमवारी 59 मॅनहोल चेंबरची सफाई करण्यात आली. ही सफाई बृहन्मुंबई महापालिकेच्या 2 सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनद्वारे करण्यात आली आहे. या मशिनरीद्वारे मॅनहोल चेंबर साफ करुन 25 हजार लिटर राळ, गाळ व खरमाती चेंबरमधून काढण्यात आला. शहरामध्ये आजअखेर पूरबाधीत क्षेत्रातील व मुख्य रस्त्यावरील 548 चेंबरची सफाई पूर्ण झालेली आहे.
हि सफाई सासने मैदान समोर, लक्षदिप नगर, अजिक्यतारा रोड, नागाळा पार्क, आरटीओ ऑफिस, ताराबाई पार्क, सर्किट हाऊस, गंगावेश पिशवीकर हॉस्पिटल ते महाद्वार रोड, रंकाळा टॉवर ते धुन्याची चावी, दुधाळी शुटिंग ग्राऊंड ते हरी मंदीर, निगडे घट्टी, आदित्य कॉर्नर या परिसरात करण्यात आली.