Home Uncategorized टोयोटा किर्लोस्कर मोटरने इनोव्हा हायक्रॉस झेडएक्स आणि झेडएक्स (ओ) ग्रेडसाठी बुकिंग पुन्हा सुरू केले

टोयोटा किर्लोस्कर मोटरने इनोव्हा हायक्रॉस झेडएक्स आणि झेडएक्स (ओ) ग्रेडसाठी बुकिंग पुन्हा सुरू केले

18 second read
0
0
21

no images were found

टोयोटा किर्लोस्कर मोटरने इनोव्हा हायक्रॉस झेडएक्स आणि झेडएक्स (ओ) ग्रेडसाठी बुकिंग पुन्हा सुरू केले

बंगलोर: टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने 1 ऑगस्ट 2024 पासून इनोव्हा हायक्रॉस झेडएक्स आणि झेडएक्स (ओ) मॉडेल्ससाठी बुकिंग पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये लाँच झाल्यापासून, इनोव्हा हायक्रॉसला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे, एमपीव्हीच्या विशालतेसह एसयूव्हीचे प्रमाण आणि संतुलन याची प्रशंसा केली गेली आहे. व्हर्सटाईल इनोव्हा हायक्रॉस, सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेरियंट [एसएचईव्ही] तसेच गॅसोलीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, ती त्याच्या ग्लॅमर कोशंट, अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, कम्फर्ट, सेफ्टी फीचर्स आणि गाडी चालवण्याचा उत्साह यासाठी ओळखली जाते.

उच्च मागणीमुळे, टॉप एंड ग्रेडचे बुकिंग तात्पुरते होल्डवर ठेवण्यात आले होते. या कालावधीत, इनोव्हा हायक्रॉसच्या इतर ग्रेड, हायब्रीड आणि गॅसोलीन या दोन्ही ग्रेडसाठी बुकिंग सुरू होती. सुव्यवस्थित आणि वाढीव पुरवठ्यामुळे, वेटिंग पिरियड कमी झाला असून इनोव्हा हायक्रॉस टॉप एंड ग्रेडचे बुकिंग सुरू झाले आहे.

श्री सबरी मनोहर – वाइस प्रेसिडेंट, सेल्स-सर्व्हिस-युज्ड कार बिझनेस – टोयोटा किर्लोस्कर मोटर, या घोषणेवर भाष्य करताना म्हणाले, “1 ऑगस्ट 2024 पासून इनोव्हा हायक्रॉस, झेडएक्स आणि झेडएक्स (ओ) च्या टॉप-एंड ग्रेडसाठी बुकिंग पुन्हा सुरू झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. हे ग्राहकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आमच्या विविध उत्पादन पर्यायांमध्ये प्रवेश देण्यासाठी आमची वचनबद्धता दर्शवते. इनोव्हा हायक्रॉस हे अत्यंत लोकप्रिय मॉडेल बनले आहे, जे त्याच्या अतुलनीय आराम आणि सोयीसाठी कौतुकास्पद आहे. अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक सिस्टम आणि मजबूत डिझाइनसह, इनोव्हा हायक्रॉसने बाजारात नवीन बेंचमार्क स्थापित केले आहेत. आमच्या ग्राहकांनी या उत्पादनाला दिलेली मजबूत मान्यता आणि विश्वासाबद्दल आम्ही खरोखरच आभारी आहोत.

बुकिंग तात्पुरते होल्डवर ठेवण्याच्या कालावधीत आमच्या मूल्यवान ग्राहकांच्या संयमाची आम्ही मनापासून प्रशंसा करतो आणि कोणत्याही गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आम्हाला खात्री आहे की इनोव्हा हायक्रॉस टॉप-एंड ग्रेड्सचे बुकिंग पुन्हा सुरू केल्याने आमच्या ग्राहकांचा ड्रायव्हिंग अनुभव अधिक मजबूत होईल आणि त्यांच्या गतिशीलते बद्दलच्या इच्छा पूर्ण होतील.”

टोयोटा न्यू ग्लोबल आर्किटेक्चर (टीएनजीए) वर आधारित, इनोव्हा हायक्रॉस टोयोटाची जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त गुणवत्ता, टिकाऊपणा आणि विश्वासार्हता साजरी करते आणि ब्रँडचा वारसा प्रतिबिंबित करते. हे 5व्या जनरेशनच्या सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टमद्वारे समर्थित आहे, ज्यामध्ये टीएनजीए 2.0-लिटर 4-सिलेंडर गॅसोलीन इंजिन आणि ई-ड्राइव्ह सिक्वेन्शिअल शिफ्टसह मोनोकोक फ्रेम आहे, जे जास्तीत जास्त 137 किलोवॅट (186 PS) पॉवर आउटपुट देते. हे जलद प्रवेग आणि बेस्ट -इन-सेगमेंट इंधन अर्थव्यवस्था देते, जे इनोव्हा हायक्रॉसला उद्याच्या हरित भविष्यासाठी एक योग्य पर्याय बनवते.

कुटुंबाच्या गरजांसाठी डिझाइन केलेले, वैशिष्ट्यांनी परिपूर्ण इनोव्हा हायक्रॉस हे प्रत्येक प्रसंगासाठी एक योग्य वाहन आहे, जे ग्लॅमर, मजबूती, आराम, सुरक्षितता आणि प्रगत तंत्रज्ञान देते. टोयोटाच्या समृद्ध जागतिक एसयूव्ही वारशातून प्रेरणा घेऊन, इनोव्हा हायक्रॉसमध्ये भरपूर जागेसह मजबूत आणि बळकट डिझाइन आहे, जे सर्वांना लवचिक आणि आरामदायी बसण्याची सुविधा देते. ही व्हर्सटाईल कार अशा कुटुंबांसाठी योग्य आहे ज्यांना अशी कार हवी आहे जे सुरळीत, स्ट्रेस-फ्री ड्राइव्ह करताना, खडबडीत रस्त्यांवरूनही प्रवास करू शकते.

निर्बाध बुकिंग अनुभव आणि वेळेवर डिलिव्हरी सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत. ग्राहक www.toyotabharat.com वर त्यांचे ऑनलाइन बुकिंग करू शकतात किंवा त्यांच्या जवळच्या टोयोटा डीलरशिपला भेट देऊ शकता

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महापालिकेमार्फत 20 ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन

महापालिकेमार्फत 20 ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन  कोल्ह…