Home Uncategorized कोल्हापूर येथे विशाळगड अतिक्रमणमुक्तीसाठी मूक आंदोलन !

कोल्हापूर येथे विशाळगड अतिक्रमणमुक्तीसाठी मूक आंदोलन !

6 second read
0
0
31

no images were found

कोल्हापूर येथे विशाळगड अतिक्रमणमुक्तीसाठी मूक आंदोलन !

 

कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज आणि असंख्य मावळे यांनी प्राणांचे बलीदान देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि धर्मरक्षण केले. आज त्याच गडांवर अतिक्रमणे होत आहेत. तरी विशाळगडासह सर्वच गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करण्यात यावेत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 5 ऑगस्ट या दिवशी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मूक निदर्शने करण्यात आली. यात धर्मप्रेमींनी हातात हस्तफलक धरून प्रबोधन आणि जागृती केली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रथमेश गावडे, श्री. रामभाऊ मेथे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

या फलकांवर ‘आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे !’, ‘तुझ्या गडांची ही व्यथा, आता राजा कळू दे सार्‍या जगास’, ‘गड-किल्ल्यांनी राखले स्वराज्य, गड किल्ल्यांनी स्थापिले स्वराज्य !’, ‘मोकळा श्‍वास घेण्यासाठी वाट पाहतो आहे विशाळगड !’, ‘विशाळगडावरील अतिक्रमण रोखा, शिवकालीन इतिहासाचे जतन करा !’, ‘मुक्त झाला प्रतापगड; आता वाट पहातोय विशाळगड ! ‘ना हाजी का ना काझी का, हर गड है छत्रपती शिवाजी महाराज का ।’, असा जागृतीपर मजकूर लिहिण्यात आला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकोट हे महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहेत. तेथील विविध स्मारके ही पराक्रमाची साक्ष देणारी प्रेरणास्थाने आहेत. हिंदवी स्वराज्याचा वारसा असणार्‍या या गडकिल्ल्यांसाठी अनेक शूरवीर मावळ्यांनी रक्त सांडले. या गडकिल्ल्यांवर गेल्यावर आजही आपल्या पराक्रमी इतिहासाचा अभिमान वाटून उर भरून येते. अशांपैकीच एक असलेला म्हणजे विशाळगड ! मात्र शिवछत्रपतींचा हा अमूल्य ठेवा राज्याचे पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज दुरावस्थेत आहे. विशाळगडावर 14 जुलै जो गडप्रेमींचा उद्रेक झाला; तो प्रशासनाच्या अपयशी भूमिकेमुळेच झाला आहे, असे असतांना आंदोलनाकर्त्या हिंदूंवर मात्र दरोड्यासारखी कलमे का लावली जात आहेत ? तसेच अनेक निरपराध हिंदूंनाही या प्रकरणी अटक करण्यात येत आहे. हे सर्व प्रकार चुकीचे असून या सर्व प्रकरणी हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी आम्ही करत आहोत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…