no images were found
दहा मीटर एअर रायफलमध्ये नेमबाज रुद्रांक्ष पाटीलला सुवर्णपदक
ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने शुक्रवारी (30 सप्टेंबर) 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले.
त्याने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे. यासह त्याने महाराष्ट्र संघाला सुवर्णपदकाचे खाते उघडून देत ठाण्याच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांक्षने फायनलमध्ये अचूक नेम धरत 17 गुणांची कमाई केली. त्याचसोबत किताबाचा मानकरी ठरला.
रुद्रांक्ष पाटील हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा सुपुत्र आहे.
महाराष्ट्र संघाचा युवा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने पात्रता फेरीमध्ये सर्वोत्तम कामगिरी सादर करत फायनल गाठली. यंदाच्या सत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे तो या गटामध्ये किताबाचा दावेदार मानला गेला होता. उत्कृष्ट कामगिरीचे सातत्य कायम राखत त्याने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. आगामी कैरो येथील आयोजित आणि चॅम्पियनशिपमध्ये तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
रुद्रांक्षची कामगिरी कौतुकास्पद
महाराष्ट्राचा युवा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने फायनलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत त्याने सुवर्णपदक जिंकले. त्याने याच सुवर्णपदकातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातून महाराष्ट्राच्या नावे पहिल्या सुवर्णपदकाची नोंद झाली. त्याची ही कामगिरी निश्चितपणे युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी रुद्रांक्षवर कौतुकाचा वर्षाव केला.