
no images were found
मुंबई-गोवा महामार्गावर महिंद्र थार आणि दुचाकीचा विचित्र अपघात
रत्नागिरी : सकाळी ज्याच्या विरोधात बातमी येते, त्याच्याच गाडीची धडक बसून पत्रकाराचा मृत्यू होतो.. हा योगायोग असू शकतो? तर नक्कीच नाही.. हा ठरवून घडवून आणलेला घातपात असून त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य प्रमुख एस.एम देशमुख यांनी केली आहे.. या प्रकरणी आरोपीस अटक केली गेली असली तरी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी देखील मराठी पत्रकार परिषदेने केली आहे.. काल राजापूर येथे थार आणि दुचाकी अपघात होऊन त्यात पत्रकार शशिकांत वारीसे हे गंभीर जखमी झाले. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर राजापूर पोलीस स्थानकात ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघाताची दुसरी बाजू समोर आल्यानंतर अपघातात मृत झालेल्या शशिकांत वारीसे यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला आहे.
काल सकाळी ८ वा. ३ मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती. “मोदिजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ब्यानरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो” अशा आशयाची ती बातमी होती.. बातमीचे कात्रण ही वारीसे यांनी सकाळी ग्रुपवर टाकले होते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी लावलेल्या ब्यानर संदर्भात हि बातमी होती. यानंतर दुपारी १.१५ च्या दरम्यान राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या महेंद्र थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत वारीसे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले.