
no images were found
पत्नीची हत्या करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर
बीड : केज तालुक्यातील ढाकेफळ शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली, रागाच्या भरात पतीने आपल्याच पत्नीचा जीव घेतला आहे. पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत तिची हत्या पतीकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पत्नीची हत्या केल्यावर पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन, आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरती भगवान थोरात (वय 25 वर्षे) असे मृत विवाहितेचे नाव असून, भगवान शाहूराव थोरात असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई महामार्गांवर केज येथे भगवान थोरातचे ट्रॅक्टर दुरुस्तीचे गॅरेज आहे. दरम्यान मंगळवारी तो दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गॅरेजवरून घरी आला. दरम्यान यावेळी दोन्ही पती-पत्नीत वाद झाला. वाद एवढा वाढला की, संतापलेल्या भगवान थोरातने पत्नीला खालीपाडून कुऱ्हाडीने तिच्या गळ्यावर सपासप वार केला. भगवान याने केलेल्या हल्ल्यात आरतीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत पोलिसांनी भगवान थोरात याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरु आहे.