
no images were found
महावितरणच्या दरवाढीला मनसेचा एलगार
कोल्हापूर : इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राचा वीजदर हा नेहमीच जास्त आहे . तरीदेखील महावितरण 37% दरवाढीचा बोजा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या माथ्यावर मारायचा प्रयत्न करीत आहे. तरी हे वीज दरवाढीचे षडयंत्र रोखण्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम मनसे कोल्हापूर तर्फे यलगार आंदोलनाला प्रारंभ केला.तसेच या वेळी जिल्हा अधिकारी या निवेदन देण्यात आले .
या निवेदनाद्वारे मनसेचा या प्रस्तावित वीज दरवाढीला विरोध असून शासनाला त्वरित जनतेच्या भावना कळवून महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या मराठी जनतेला जाणीवपूर्वक वीज दरवाढीचा शॉक देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महावितरण च्या वीज दरवाढीचा प्रस्ताव रद्द न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी कोल्हापूर शहरामध्ये चौका चौकामध्ये बूथ लावून जनतेच्या तक्रारी एकत्र केल्या जातील व आंदोलन तीव्र करण्यात येईल असे नमूद केले.
यावेळी बोलताना जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी प्रसिद्धी माध्यम व प्रसारमाध्यमांद्वारे सर्वांनी या वीज दरवाढीला कडाडून विरोध करावा असे आवाहन केले. आज रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावेळी सर्वसामान्य जनतेच्या एक हजार तक्रारी सोबत जोडल्याचे नमूद केले. जिल्हा नेते पुंडलिक जाधव यांनी शेतकरी व कामगारांना वाचविण्यासाठी वीजदर वाढ अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले.
आज प्राथमिक स्वरूपात शहर अध्यक्ष राजू दिंडोर्ले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सचिव प्रसाद पाटील , जिल्हा नेते पुंडलिक जाधव तसेच शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले , जिल्हा सचिव प्रसाद पाटील , जिल्हा नेते पुंडलिक जाधव , निलेश लाड , अभिजीत राऊत , निलेश आजगावकर , अमित पाटील , राजन हुल्लोळी , यतीन हुरणे , रणजीत वरेकर , योगेश मोहिते , सागर साळोखे , दिलीप पाटील , गणेश शिंदे , चंद्रकांत सुकते , उत्तम वंदुरे , बाजीराव दिंडोर्ले, मोहसीन मुलानी , सुरज कानुगडे , अभिजीत संकपाळ , अमित साळुंखे इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माननीय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले.