no images were found
‘पायोनियर चषक’ बुद्धिबळ स्पर्धा रविवारी कोल्हापुरात
कोल्हापूर ( प्रतिनिधी ):-चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने अन्याज चेस क्लब ने दरवर्षी होणाऱ्या कै.मंगेशराव कुलकर्णी स्मृती भव्य खुल्या *पायोनियर चषक* खुल्या बुद्धिबळ स्पर्धा रविवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी न्यू एज्युकेशन सोसायटीचे राम गणेश गडकरी हॉल, पेटाळा , कोल्हापूर येथे आयोजित केल्या आहेत. या स्पर्धा पायोनियर एनर्जी व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरने प्रायोजित केल्या आहेत.
स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण आठ ते नऊ फेऱ्यात या स्पर्धा होणार आहेत.
गोवा,पुणे,मुंबई, हुबळी,बेळगाव, निपाणी,सोलापूर सांगली,सातारा,फलटण, रत्नागिरी,सिंधुदुर्ग व स्थानिक जयसिंगपूर, इचलकरंजी व कोल्हापूर येथील नामवंत बुद्धिबळपटू ना आमंत्रित केले आहे..साधारण 200 बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी होतील असा अंदाज आहे..रोख चाळीस हजार रुपयांची एकूण बक्षिसे व चषक आणि मेडल्स बक्षीस म्हणून ठेवले आहे.स्पर्धा विजेत्यास रोख 7000 रुपये व चषक,उपविजेत्यास रोख पाच हजार रुपये चषक व तृतीय क्रमांकास रोख चार हजार रुपये चषक देऊन गौरविण्यात येणार आहे..
मुख्य बक्षिसे 21 आहेत…त्याचबरोबर 7,9,11,13 व 15 वर्षाखालील मुलांना, साठ वर्षावरील ज्येष्ठ बुद्धिबळपटूंना, दिव्यांग बुद्धिबळपटूंना व उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटुना अशी उत्तेजनार्थ बक्षिसे 73 अशी एकूण 94 बक्षिसे ठेवली आहेत.यामध्ये 30 चषक व 64 मेडल्स दिली जाणार आहेत.या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येकी चारशे रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे.
भाग घेऊ इच्छिणाऱ्या बुद्धिबळपटूनी आपली नावे प्रवेश फी सह आरती मोदी(8149740405) यांच्याकडे गुगल पे करून नोंदवावीत व गुगल फॉर्म भरावा..https://forms.gle/mCdkuNPamCg2i9PS7
अधिक माहितीसाठी पुढील व्यक्तींशी संपर्क साधावा..
1) मनीष मारुलकर- 9922965173 2)धीरज वैद्य – 9823127323, 3)आरती मोदी – 8149740405 4)उत्कर्ष लोमटे -9923058149 5)प्रीतम घोडके – 8208650388 6) रोहित पोळ :- 9657333926
असे स्पर्धा प्रमुख महेश कुलकर्णी, नितीन वाडिकर मनिष मारुलकर,धीरज वैद्य व मुख्य आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी या पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.