Home शासकीय पिंपळगाव खुर्द ग्रामपंचायतीत मुश्रीफ गटाची बाजी

पिंपळगाव खुर्द ग्रामपंचायतीत मुश्रीफ गटाची बाजी

3 second read
0
0
47

no images were found

पिंपळगाव खुर्द ग्रामपंचायतीत मुश्रीफ गटाची बाजी
सिद्धनेर्ली : पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ गटाच्या शीतल अमोल नवाळे या सरपंचपदी निवडून आल्या, तर ११ पैकी ८ जागा जिंकत मुश्रीफ गटाने सत्ता काबीज केली, तर विरोधी शाहू ग्रुपचे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे व माजी आमदार संजय घाटगे यांच्या आघाडीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. समरजितसिंहगटाच्या मंजू आनंदा वाईंगडे यांना १३३५ मते मिळाली, तर नोटास ३१ मते नोंदविली. मुश्रीफ गटाच्या सौ. नवाळे यांनी वाईंगडे यांचा ३९८ मतांनी पराभव केला. रविवारी (ता.१८) चुरशीने मतदान झाले होते. कागलच्या तहसीलदार कार्यालयातील सभागृहात मतमोजणी झाली.
सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदाची थेट जनतेतून निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेखा कांबळे यांनी काम पाहिले. निवडणुकीत मंडलिक व मुश्रीफ गटविरोधात दोन्ही घाटगे गटाच्या समर्थकांच्या आघाडीत दुरंगी लढत झाली. मुश्रीफ गटांतर्गत नवाळे व चौगुले गट एकत्र आले होते. घाटगे गटाला तीन जागा मिळाल्या. यात राजे गटाला दोन व बाबा गटाला एक जागा मिळाली. प्रभाग तीनमधून अपक्ष नागेश आकुर्डे यांना ९४ मते मिळाली. निकालानंतर मुश्रीफ गटाच्या समर्थकांनी फटाक्यांचे आतषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला.
विजयी उमेदवारांची नावे, कंसात मते-
l मुश्रीफ गट- सदाशिव चौगुले (४८७), संध्या पोवार (४४१), पिंटू कांबळे (५००), जी. डी. कांबळे (४५३), स्वाती परीट (४२१), महादेवी आकुर्डे (३०१) असिफ शेख (४५२), शैला मगदूम(३८०).
l घाटगे गट- कविता तेलवेकर (४७६), नेहा मगदूम (४२९), संजय तेलवेकर (२७६).
नवाळे घराण्यात सरपंचपदाचा चौथ्यांदा मान
सरपंचपदी निवडून आलेल्या शीतल या नवाळे घराण्यातील चौथ्या सरपंच आहेत. याआधी अशोकराव नवाळे, राजाराम नवाळे, विलास नवाळे हे या घराण्यातून सरपंच झाले आहेत, तर सरपंच सौ. नवाळे यांचे माहेर गावातीलच घाटगे कुटुंबातील असून, त्यांचे आजोबा आनंदा घाटगे पिंपळगावचे पहिले सरपंच होते. त्यामुळे सासऱ्यानंतर सुनेला व आजोबानंतर नातीला सरपंचपदाचा मान मिळाला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…