Home स्पोर्ट्स स्वप्निल कुसाळे ठरला ऑलिम्पिक पदक विजेता !  

स्वप्निल कुसाळे ठरला ऑलिम्पिक पदक विजेता !  

36 second read
0
0
19

no images were found

      स्वप्निल कुसाळे ठरला ऑलिम्पिक पदक विजेता !                                                       कोल्हापूर( प्रतिनिधी ):-जगभरातील अव्वल नेमबाजपटूसोबत स्पर्धा, स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वच खेळाडूंचे शर्थीचे प्रयत्न, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा अशा वातावरणात संपूर्ण देशवासियांच्या आशा-आकाक्षा सार्थ ठरवित कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाजपटू स्वप्निल सुरेश कुसाळने पॅरिस ऑलिम्पिकपद पदक जिंकले. गुरुवारी दुपारी रंगलेल्या या स्पर्धेत स्प्वनिलने कास्य पदकाचा निशाणा साधताच देशवासियांच्या आनंदाला भरते आले. फटाक्यांची आतषबाजी करत ठिकठिकाणी जल्लोष केला. स्वप्निलच्या माध्यमातून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यावर आणखी एका पदकाची नोंद झाली.५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात स्वप्लिलने ही कामगिरी केली . सोबत कोल्हापूरचे नावही आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा झळकले. सोबत नेमबाजीतील वर्चस्व अधोरेखित झाले. तब्बल 72 वर्षांनी कोल्हापूरच्या खेळाडूंनी ऑलम्पिक मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळवले. 1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिपिक स्पर्धेमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.                                    ऑलिम्पिक स्पर्धेतील या खेळ प्रकाराकडे गुरुवारी सकाळपासूनच साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. दुपारी साडेबारा, एक वाजता स्पर्धेला सुरुवात झाली आणि कोल्हापूरवासियांनी टीव्हीसमोर ठाण मांडले. दरम्यान बुधवारी झालेल्या पात्रता फेरीत स्वप्निलने ६०० गुणांपैकी ५९० गुण मिळवत अंतिम फेरीत स्थान पक्क केले होते. कामगिरीत तेच सातत्य कायम ठेवत स्वप्नील यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणार, देशाची मान उंचावणार या अपेक्षा मनी बाळगत सारेजण स्वप्नीलच्या खेळाविषयी विश्वास बाळगून होते.

राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील हा खेळाडू. वडील, सुरेश कुसाळे हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक. तर आई  अनिता या कांबळवाडीच्या लोकनियुक्त सरपंच. त्याचा जन्म सहा ऑगस्ट १९९५ रोजी झालेला. शालेय जीवनातच नेमबाजीवर लक्ष केंद्रित केले. आणि अल्पावधीतच कौशल्य सिद्ध केले. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजविली. या कामगिरीच्या बळावर २०१५ मध्ये रेल्वेमध्ये टीसी म्हणून नियुक्ती झाली. मध्यमवर्गीय कुटुंबांतील या तरुण खेळाडूची कामगिरी प्रत्येक स्पर्धेनिहाय उंचावत गेली.

२०१५ मध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत कनिष्ठ गटात ५० मीटर रायफल प्रोनमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. तिरुंवनंतपुरम येथे झालेल्या ६१ व्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. २०२२ मध्ये कैरो येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत चौथ्या स्थानासह ऑलिम्पिक बर्थ कोटाही मिळवला. भोपाळ येथे मे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरी पार करत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान निश्चित केले होते.

 पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत मारलेली मुसंडी निश्चितच अभिमानस्पद ठरली. तो अंतिम फेरीत अचूक वेध साधत पदक जिंकणार ही भावना स्वप्निलने सार्थ ठरविली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…