Home मनोरंजन मालिका ‘भीमा’मध्‍ये स्मिता साबळे धनियाची भूमिका साकारणार! 

मालिका ‘भीमा’मध्‍ये स्मिता साबळे धनियाची भूमिका साकारणार! 

2 min read
0
0
33

no images were found

मालिका भीमामध्‍ये स्मिता साबळे धनियाची भूमिका साकारणार

एण्‍ड टीव्‍हीवरील आगामी मालिका भीमाने घोषणा झाल्‍यापासून प्रेक्षकांमध्‍ये उत्‍कंठा निर्माण केली आहे. लाँच करण्‍यात आलेल्‍या दोन प्रोमोंनी या उत्‍सुकतेमध्‍ये अधिक वाढ केली आहे. प्रत्‍येक पात्राचे कौतुक करण्‍यात आले असले तरी भीमाची आई धनियाची भूमिका साकारताना पाहायला मिळणाऱ्या स्मिता साबळे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रखर ऑडिशन प्रक्रियेनंतर स्मिता साबळे यांना या सामाजिक ड्रामामध्‍ये धनियाची भूमिका साकारण्‍यासाठी निवडण्‍यात आले आहे. त्‍या म्‍हणाल्‍या, ”मला मालिका भीमामध्‍ये धनियाची भूमिका साकारण्‍यासाठी निवडण्‍यात आल्‍याने सन्‍माननीय वाटते. मी पहिल्‍यांदा कथानक वाचले तेव्‍हा त्‍वरित धनियाच्‍या भूमिकेमध्‍ये भारावून गेले. मुलगी भीमाप्रती तिच्‍या अतूट प्रेमाने माझे लक्ष वेधून घेतले. ही भूमिका माझ्या मनाच्‍या खूप जवळ आहे आणि मी तिच्‍यामध्‍ये सामावून गेल्‍यासारखे वाटते. मी प्रेक्षकांसमोर तिची कथा सादर करण्‍यास आणि अशा प्रतिभावान टीमसोबत काम करण्‍यास उत्‍सुक आहे.” आपल्‍या भूमिकेबाबत सांगताना स्मिता म्‍हणाल्‍या, ”३५ वर्षीय मजूर असलेली धनिया काळजीवाहू व खंबीर आई आहेजी तिच्‍या कुटुंबाच्‍या आरोग्‍याची काळजी घेते. सामाजिक आव्‍हानांना न जुमानता मुलगी भीमाच्‍या शिक्षणासाठी तिच्‍या समर्थनामधून तिचा प्रेरक उत्‍साह दिसून येतो. अडथळ्यांचा सामना करावा लागत असला तरी धनियाचे धैर्य व निर्धार कधीच कमी होत नाही.” 

स्मिता यांनी मालिकेसाठी शूटिंगला सुरूवात केली आहे आणि या अनुभवाबाबत सांगताना त्‍या म्‍हणाल्‍या, ”संपूर्ण टीम मालिकेची निर्मिती करण्‍याप्रती समर्पित आहे. ही मालिका मनोरंजनपूर्ण असण्‍यासह अर्थपूर्ण व प्रभावी आहे. लेखन ते सेट डिझाइनपर्यंत प्रॉडक्‍शनच्‍या प्रत्‍येक पैलूमध्‍ये बारकाईने काळजी घेण्‍यात आली आहेजे उल्‍लेखनीय आहे. माझ्यासोबत प्रतिभावान सह-कलाकार व टीम सदस्‍य आहेतजे या कथानकाला सादर करण्‍यासाठी उत्‍सुक आहेत. सर्वोत्तमतेप्रती त्‍यांची सहयोगात्‍मक कटिबद्धता या प्रक्रियेला अधिक लाभदायी बनवतात.”  मालिका भीमाच्‍या कथानकाबाबत सांगताना स्मिता साबळे पुढे म्‍हणाल्‍या, ”१९८० च्‍या दशकात स्थित मालिका भीमा‘ सामाजिक ड्रामा आहेजो वंचित पार्श्‍वभूमीमधील तरूणीच्‍या जीवनगाथेला सादर करतो. ही मालिका समान अधिकार मिळवण्‍यासाठी तिच्‍या संघर्षांना दाखवतोजेथे धनिया प्रत्‍येक प्रतिकूल स्थितीमध्‍ये तिच्‍या मागे खंबीरपणे उभी राहते. प्रेक्षकांना स्थिरता व आशेची प्रबळ कथा पाहायला मिळेलजेथे धनिया आणि भीमा कुटुंबसमाज व आर्थिक आव्‍हानांच्‍या गुंतागूंतींचा सामना करतात. ही आई व तिच्‍या  मुलीमधील प्रेमताकद व अतूट नात्‍याची कथा आहे.” 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…