Home सामाजिक जुलैमध्ये महिंद्रा ट्रक्स आणि बसेससाठी ५ नवीन डीलरशिपचे उद्घाटन

जुलैमध्ये महिंद्रा ट्रक्स आणि बसेससाठी ५ नवीन डीलरशिपचे उद्घाटन

11 second read
0
0
33

no images were found

जुलैमध्ये महिंद्रा ट्रक्स आणि बसेससाठी ५ नवीन डीलरशिपचे उद्घाटन

 

पुणे : आर्थिक वर्ष २४ मध्ये व्यवसाय प्रमाणात ४६% च्या ४ वर्षांच्या CAGR वाढीनंतर, महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनने (MTBD) जुलै महिन्यात भारतातील चार राज्यातील पाच अत्याधुनिक डीलरशिपचे उद्घाटन केले. यामुळे ड्रायव्हरला निवास, २४ तास ब्रेकडाउन सहाय्य आणि AdBlue उपलब्धता पुरवित ३७ सर्व्हिस बे ची भर पडली असून दररोज ७५ पेक्षा जास्त वाहनांना सेवा देता येऊ शकत आहे.

या प्रसंगी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे व्यावसायिक वाहने विभागाचे व्यवसाय प्रमुख श्री. जलज गुप्ता म्हणाले, “भारतीय सीव्ही मार्केटमध्ये एमटीबीडीचे मजबूत स्थान असून अनेक विभाग आणि बाजारपेठांमध्ये ते ३ ऱ्या क्रमांकावर आहेत. आम्हाला खात्री आहे की आमच्या नेटवर्कमध्ये या ५ नवीन डीलरशिपची भर पडल्यामुळे आमची पोहोच वाढण्यास मदत होईल. त्यामुळे आमच्या ग्राहकांना वाहनांच्या सर्व्हिसिंगसाठी मदत होईल आणि त्यांच्या ताफ्यांना अधिक अपटाइम मिळेल. आम्ही पुढील संधींबद्दल आणि आमच्या आदरणीय ग्राहकांना नाविन्यपूर्ण आणि कार्यक्षम वाहतूक उपायसुविधा प्रदान करण्यासाठी उत्सुक आहोत.”

श्री. गुप्ता यांनी BS6 OBD II श्रेणीतील ट्रकसाठी “जादा मायलेज नहीं तो ट्रक वापस” ची नवीन मायलेज हमी सादर करताना त्यांच्या वाहनाच्या उत्कृष्ट तांत्रिक सामर्थ्यावर भाष्य केले. याद्वारे वाहतूकदारांसाठी नफ्याचे वाढवून अतुलनीय मूल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मजबूत डीलर भागीदारांसह ही अत्याधुनिक 3S सुविधा केंद्रे उच्च ग्राहक सेवा मापदंड प्रस्थापित करतील आणि MTB व्यवसायाचा विस्तार करतील असेही त्यांनी पुढे सांगितले.

महिंद्रा BLAZO X, FURIO, OPTIMO आणि JAYO ही भारतातील एकमेव CV ट्रक श्रेणी आहे जी सर्वोत्तम श्रेणीतील इंधन कार्यक्षमतेसह दुहेरी सेवा हमी देते. MTBD ने ४८ तासांत ट्रक परत रस्त्यावर आणून ब्रेकडाउन सेवेवर अपटाइमची खात्रीशीर हमी दिली आहे. अन्यथा कंपनी ग्राहकाला प्रतिदिन १,००० रु. देईल. याव्यतिरिक्त, डीलर वर्कशॉप किंवा कंपनीमध्ये ३६ तासांत वाहनाच्या टर्नअराउंडची हमी असून नाहीतर कंपनी प्रतिदिन ३,००० रु. भरेल. सातत्यपूर्ण उत्पादन नाविन्यपूर्णता आणि ग्राहककेंद्री दृष्टिकोन हे MTBD च्या केंद्रस्थानी असल्यामुळे अशी हमी देणे शक्य झाले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…