no images were found
केंद्रीय मंत्र्याच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे पैसे उकलण्याचा प्रयत्न
मुंबई : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नावे बनावट फेसबुक काढून पैशाची मागणी करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बनावट फेसबुक अकाऊंट काढल्याच्या प्रकरणातून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फेसबुक अकाऊंटमार्फत १५ हजार रूपयांची मागणी करण्यात आल्याचे समजते.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट काढण्यात आले होते. तसेच त्या माध्यमातून बऱ्याच लोकांना फ्रेंड रिक्वेस्टस पाठवण्यात येवून १५ हजार रूपयांची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर दाखल केलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सदर फेसबुक अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहे.