no images were found
शिवाजी विद्यापीठात ‘प्राचार्य बाळकृष्ण व्याख्यान मालेचे’ आयोजन
कोल्हापूर ( प्रतिनिधी ):-शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभाग आणि शाहू संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. २३ जुलै २०२४ रोजी सकाळी ठीक ११:३० वा. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू महाराज सिनेट सभागृहात ‘प्राचार्य बाळकृष्ण व्याख्यान मालेचे’ आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाळकृष्ण हे राजाराम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य होते. नामवंत शिक्षण तज्ज्ञ, थोर इतिहासकार म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. शिवाजी विद्यापीठाचे आद्य संकल्पक म्हणूनही त्यांचा गौरव केला जातो. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. अरुण भोसले हे गुंफणार आहेत. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के भूषविणार आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पी. एस. पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व अभ्यासक,प्राध्यापक, इतिहास प्रेमी यांनी मोठ्या संख्येने या व्याख्यान मालेस आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. अवनीश पाटील (विभागप्रमुख, इतिहास अधिविभाग), डॉ. जयसिंगराव पवार (संचालक, शाहू संशोधन केंद्र), डॉ. व्ही. एन. शिंदे (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ) यांनी केले आहे.